मुलावर मुंबई येथे उपचार सुरु असतांना घरफोडीत 1 लाख 69 हजार किंमतीचा मुद्देमालाची झाली चोरी….

बातमी कट्टा:– काल मध्यरात्री घरफोडी झाल्याची घटना घडली असून चोरांंनी रोख रक्कमसह 1 लाख 69 हजार किंमतीचा मुद्देमालावर हातसाफ केला आहे.घरातील मुलावर मुंबई येथे टाटा रुग्णालयात कॅन्सर आजारावर उपचार सुरु असतांना त्या कुंटूंबातील घरातील सदस्यांवर चोरांनी चोरी करुन मोठे संकट उभे केले आहे.

शिरपूर शहरातील शकुंतला लॉन्सच्या मागे सखुबाई नागोसिंग जमादार वय 55 यांच्या घरी दि 16 रोजी मध्यरात्री घरफोडी झाल्याची घटना घडली आहे.याबाबत शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे सखुबाई जमादार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की,सखुबाई नागोसींग जमादार वय ५५ व्यवसाय घरकाम रा.६२ व शंकर पांडू माळी नगर,शकुंतला लॉन्सचे मागे शिरपूर हे मुलगा मुकेश सोबत राहतात तर मोठा मुलगा सतिष हा त्यांची पत्नी दिपाली व दोन मुलीसह अर्थे येथे राहतात.ते अधून मधून त्यांचे पत्नी मुलांसह घरी येत जात असतात.मुलगा सतिष यास कॅन्सरचा आजार असल्याने तीन महिन्यांपासून त्यांचा टाटा हॉस्पीटल मुंबई उपचार सुरु असल्याने त्यांची देखभाल करण्यासाठी मुलगा मुकेश हा त्याच्याजवळ मुंबई येथे थांबतो.

दि 06 रोजी सायं. ७ वा. मुलगा मुकेश यास कामावर जायचे असल्याने सखुबाई जमादार व मुलगा मुकेश हे सतिष याच्या जवळ दवाखान्यात थांबण्यासाठी मुंबई येथे गेले.मुंबई जात असतांना घरास कुलूप लावले होते.मुलगा सतिष दवाखान्यात गंभीर असतांना सखुबाई जमादार व मुलगा मुकेश असे दोघेजण त्याचेजवळ थांबले होते.

घराशेजारी राहणारे नवनाथ काशिराम जमादार यांनी मुलगा मुकेश यास फोन करून कळविले की, घराचे दरवाज्याचा कडीकोंडा तुटलेला असून दरवाजा उघडा असून घरात चोरी झाली असावी असे सांगितले. त्यामुळे सखुबाई जमादार व मुलगा मुकेश असे मुंबई येथून शिरपूर येथे घरी येण्यासाठी निघाले. आज दि 18 रोजी सकाळी ०८.३० वा. घरी आले तेव्हा पुढील दरवाज्याचा कडीचा कोंडा तुटलेला होता व कुलुप जागेवर दिसले नाही. घरात जावून पाहिले असता पहिल्या रूममधील शोकेसचे लाकडी कपाटातील सामान अस्ताव्यस्त केलेला दुस-या रूम मधील मधील गोदरेज कपाटाचे दरवाजे उचकवून कपाट उघडून कपाटाचे लॉकर कशानेतरी तोडून घरातील गोदरेज कपाटात ठेवलेले ७० हजार रोख रूपये व 95 हजार रुपये किमतीचे 58.5 ग्रॅम सोने व 4 हजार रुपये किमतीचे 10 भार चांदीचे दागिणे असे एकूण 1लाख 69 हजार रुपये चोरी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: