मुलीच्या खूनाच्या घटनेतील आरोपीची माहिती देणाऱ्यास पोलिसांकडून ५० हजारांचे बक्षीस जाहीर

बातमी कट्टा:-शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथील शेतात दादर कापणीचे काम सुरु असतांना मजूरांना उग्र वास येऊ लागला त्यांनी समोर बघितले तर एका गोणपाटात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याचे दिसले.ते बघून सर्व मजूर घाबरले ते गावाकडे पळाले गावात ही घटना सांगितली आणि पोलिसांना माहिती दिली घटनास्थळी पोलिसांनी ते गोणपाट उघडले तेव्हा धक्कादायक प्रकार उघड झाला त्यात मुलीची कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.अन् त्या मृतदेहावर असलेल्या कपड्यांवरून तो मृतदेह ७ ते ८ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा असल्याचे उघड झाले. या घटनेमुळे संपूर्ण धुळे जिल्हा हादरला घटनस्थळी पोलिस प्रशासन दाखल झाले चौकशी करण्यात आली.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरु आहे मात्र अद्याप कुठलाच धागादोरा पोलिसांच्या हाती आला नसल्याने मारेकऱ्याची माहिती देणाऱ्यास ५० हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. याबाबत पत्रक देखील देखील जाहीर केले आहे.

दि ५ रोजी १५ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार तीच्या वडीलांनी शिंदखेडा पोलिस स्टेशनात दिली होती.त्यात म्हटले होते की गावाजवळ मुलगा दुसऱ्यांच्या शेतात मजूरी काम करत होता त्याला जेवणाचा डब्बा देण्यासाठी मुलगी तेथे गेली मात्र डब्बा देऊन ती घरी परतलीच नाही तिचा सर्वत्र शोध घेतला ती मिळुन आली नाही त्यामुळे तीचा अज्ञाताने अपहरण केल्याची तक्रार वडीलांनी दि ५ रोजी शिंदखेडा पोलिस स्टेशनात दिली.यानंतर तिचा पोलिसांकडून देखील शोध सुरु होता.सोनल मिडीयाच्या मदतीने नातेवाईक देखील त्या मुलीचा शोध घेत होते.

दि ११ रोजी शिंदखेडा तालुक्यातील विरदेल गावातील सादु वडार यांच्या शेतात दादर कापणीचे काम सुरु होते दुपारच्या सुमारास दादर कापणी दरम्यान उग्र वास येऊ लागला अत्यंत खराब वास येत असतांना त्यांना त्या दादरच्या शेतात एक गोणपाट दिसले त्यात कोणाचातरी मृतदेह असल्याचे त्यांना आढळले.ते बघून सर्वच मजूर भयभीत झाले आणि घाबरून  गावात विरदेल गावात पळाले.त्यांनी गावात घटलेल्या घटनेची माहिती दिली.याबाबत गावकऱ्यांनी पोलिसांना संपर्क साधला पोलिस घटनास्थळी दाखल झाले.त्यावेळी शेतात असलेल्या ते गोणपाट फाडले तेव्हा त्यात मुलीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याचे दिसून आले.

याबाबत त्या मृतदेहाच्या कपड्यांवरून सदर मृतदेह हा दि ५ रोजी बेपत्ता झालेल्या त्या मुलीचा असल्याचे उघड झाले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी धुळे येथील रुग्णालयात दाखल केले.घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक किशोर काळे,उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे,स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि शिंदखेडा पोलिस प्रशासनासह फॉरेन्सिक पथक दाखल झाले रात्रभर त्यांनी घटनास्थळी तपासणी केली.याप्रकरणी त्या मुलीच्या वडीलांनी शिंदखेडा पोलिस स्टेशनात खूनाचा गुन्हा दाखल केला.या घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्याकडे आहे.

पोलिसांकडून रात्रंदिवस चौकशी करुन देखील काही एक धागादोरा हाती लागलेला नाही.याघटने संदर्भात अल्पवयीन मुलीस जिवेठार करणारा अज्ञात आरोपी याचा शोध सुरु असून आरोपीताची माहिती देणा-यास पोलीस अधिक्षक, धुळे यांनी रुपये ५० रोख रक्कमेचे बक्षीस जाहीर केले आहे. माहिती देणा-याचे नाव गाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे याबाबत पत्रक जाहीर करण्यात आले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: