बातमी कट्टा:- मुसळधार पाऊस,रात्री सर्व काही बंद,हॉटेल देखील बंद,जेवायला अन्न नाही,अश्या बिकट परिस्थितीत 250 पेक्षा जास्त पररज्यातील प्रवासी बसस्थाकावर अडकून पडलेले होते काहींकडे तर पुढील प्रवासासाठी देखील पैसे नव्हते मात्र एनवेळी धाऊन आला त्या प्रावासींच्या मनातला देव माणूस !
राजस्थान,यु पी बिहिर,मध्यप्रदेशसह परराज्यातील प्रवासी खाजगी दोन बसेसने पुणे व मुंबईच्या दिशेने जात असतांना मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील लळींग गावाजवळ प्रादेशिक परिवहन विभागाने दोन्ही बसेस थांबवून चौकशी केली असता त्यात एका बस मध्ये 144 तर दुसऱ्या वाहनात 129 प्रवासी आढळून आले यामुळे त्या दोन्ही बसेस धुळे आगारातील बस्थानकात आणले व त्यात असलेल्या प्रवाशींना आपापल्या स्थळी जाण्याचे सांगण्यात आले तर त्या बस चालकांशर कारवाई करण्यात आली.मात्र यात कित्येक प्रवासी मोलमजुरी करणारे असल्याने त्यांना पुढील प्रवासासाठी पैसे नसल्याने ते हतबल झाले होते.त्याच्यासोबत असलेले सामान,लहान मुले यामुळे प्रवासी चिंतेत होते.कोणीही त्यांच्याकडे लक्ष देण्यास तयार नसतांना पुन्हा त्यात पाऊसाने हजेरी लावली.
250 पेक्षा जास्त असणाऱ्या प्रवासींना कोणीही तेथे वाली नसतांना धुळे भाजप पक्षाचे अनुप अग्रावल हे भर पावसात त्यांच्या मदतीसाठी धाऊन आले.त्या सर्व प्रवासींची जेवणाची व्यवस्था करुन देण्यात आली. अनुप अग्रवाल तेवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी चक्क या सर्व प्रवासींना त्यांया निश्चित ठिकाणी पोहचविण्यासाठी महामंडळाच्या बसेस करून देण्याचे सांगितले या सर्व प्रवासींना त्यांच्या निश्चित ठिकाणी पोहचविण्यासाठी कमीत कमी 1 लाख रुपये खर्च येणार आहे मात्र कुठलाही विचार न करत अनुप अग्रवाल यांनी त्या प्रवासांसाठी मदतीचा हात पुढे केला.
अनुप अग्रवाल यांच्या मदतीच्या हाकेमुळे प्रवासींच्या चेहऱ्यावर आंनद बघावयास मिळाला ऐन वेळेस देव माणूस धाऊन आला असे उदगार यावेळी त्या प्रवाशांनी काढले.