मुसळधार पावसात घर कोसळून महिलेचा मृत्यू

बातमी कट्टा:- दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.या अतिवृष्टीत 80 वर्षीय वृद्ध महिलेच्या अंगावर घर कोसळल्याने तिचा जागिच मृत्यू झाला तर 38 वर्षीय महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसाय नंदुरबार जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान होताना दिसत आहे.आज नवापूर तालुक्यातील चितवी येथील कागडीबाई धा-या गावित वय 80 या महिलेचा अंगावर घर कोसळल्याने तिच्या जागीच मृत्यू झाला आहे तर सरला भरत गावित वय 38 जखमी झाल्याची घटना घडली आहे.

गेल्या दोन दिवसापासून नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पाऊस येत असल्याने जिल्ह्यातील सूरत अमरावती महामार्ग बार तासानंतर सुरू झाला तर आदिवासी दुर्गम भागातील घाटात दरड कोसळल्याने रस्ता बंद पडला आहे चितावी गावातील महिलेच्या मृत्यू नंतर नवापूर तहसीलदार मकरंद कुलकर्णी यांनी घटनास्थळी पाहणी केली आणि तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.

WhatsApp
Follow by Email
error: