
बातमी कट्टा:- महामार्ग विभागाचे प्रमुख डॉ. रविद्रकुमार सिंगल, अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) महाराष्ट्र राज्य- मुंबई यांचे अध्यक्षतेखाली दि. २०/०६/२०२३ रोजी मुख्यालय, मुंबई येथे झालेल्या बैठकीमध्ये दिलेल्या निर्देशानुसार महामार्ग पोलीस केंद्र कार्यक्षेत्रेतील चांगले काम करणा-या तसेच प्राणांकित अपघातास जखमी इसमांना मदत करणा-या मृत्युंजय दुतांची माहिती मागविण्यात आलेली होती.यात पळासनेर येथील लोटन मोहन जगदेव यांची उत्कृष्ट मृत्यूंजय दूत म्हणून सन्मान करण्यात आला.

महामार्ग विभागाचे प्रमुख डॉ. रविद्रकुमार सिंगल, अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) महाराष्ट्र राज्य- मुंबई,डॉ. मोहन दहिकर, पोलीस अधीक्षक, महामार्ग ठाणे परिक्षेत्र ठाणे यांच्या आदेशाने महामार्ग पोलीस केंद्र,शिरपुरचे
पो.उप.नि.नरेंद्र पवार, प्रभारी अधिकारी, पो.उप.नि. मुस्तफा मिर्झा, यांनी महामार्ग पोलीस केंद्र, शिरपुर हद्दीतील एकुण मृत्युंजय दुताची संख्या ५० कामगिरीबाबत आढावा घेण्यात आला होता. त्यात मृत्युंजय दुत म्हणुन लोटन मोहन जगदेव, रा. मु.पो. पळासनेर, ता. शिरपुर, जि. धुळे यांनी अपघात ग्रस्तांना कशाप्रकारे मदत कार्य केले याबाबत माहिती देण्यात आली.
राष्ट्रीय महामार्ग क्रं. ०३ वरील पळासनेर येथे झालेल्या मागील ०३ वर्षात एकुण २२ अपघात झाले असुन त्यापैकी २५ इसम हे मयत असुन व २० इसम गंभीर जखमी आहेत. सदरचे अपघातामध्ये वेळोवेळी मृत्युंजय लोटन मोहन जगदेव, रा. मु.पो. पळासनेर, ता. शिरपुर, जि. धुळे यांनी तात्काळ म.पो. केंद्र, शिरपुर येथील प्रभारी यांना फोनव्दारे सदर घटनेची माहिती देवुन तात्काळ क्रेन तसेच रुग्णवाहिकेला फोन करून बोलावुन म.पो. केंद्र, शिरपुर येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्यासोबत सदर अपघातग्रस्तांना वैद्यकिय उपचाराकामी रुग्णवाहीकामध्ये ठेवण्यास वाहतुक सुरळीत करण्यास मदत केली व त्यामुळे अपघात ग्रस्तांना वेळीच उपचार मिळाल्याने अनेक अपघात ग्रस्तांचे प्राण वाचले आहेत. मृत्युंजय लोटन मोहन जगदेव, रा. मु. पो. पळासनेर, ता. शिरपुर, जि. धुळे यांच्या उत्कृष्ट मृत्युंजय दुत म्हणुन कामगिरीबाबत पत्र व्यवहार करण्यात आले होते. मृत्युंजय लोटन मोहन जगदेव, रा. मु.पो. पळासनेर, ता. शिरपुर, जि. धुळे यांचे नाशिक विभागात उत्कृष्ट मृत्युंजय दुत म्हणुन निवड करण्यात आली. तसेच दि. १४/०७/२०२३ रोजी डॉ. मोहन दहिकर, पोलीस अधीक्षक, महामार्ग ठाणे परिक्षेत्र ठाणे, प्रदिप मैराळे, पोलीस उपअधीक्षक, महामार्ग पोलीस विभाग, नाशिक यांच्या हस्ते ठाणे येथे उत्कृष्ट मृत्युंजय दुत म्हणुन गौरव करून तसेच प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.