बातमी कट्टा:- धुळे येथे उपचारादरम्यान मृत झालेल्या रुग्णाच्या खिशातून पैसे काढातांनाचा सि.सि.टी.व्ही व्हिडीओ व्हायरल झाला होता.अखेर देवपूर पोलीस स्टेशन येथे याबाबत 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून खिशातील 30 हजार रुपये लाबविल्याची तक्रार देण्यात आली आहे.
मृत व्यक्तीच्या खिशातून पैसे काढत असल्याचा लाजिरवाणा प्रकार सि.सि.टी.व्ही व्हिडीओतून समाज माध्यांमध्ये उघड झाला होता.हा संपूर्ण प्रकार धुळे शहरातील वाडीभोकर रोडवर असलेल्या श्रीगणेशा रुग्णालयातील असल्याचे समोर आले आहे.शिरपूर येथील धनराज छगन माळी हे शिक्षक श्री गणेशा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते.मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.यानंतर मयत धनराज माळी यांचे खिसे रुग्णालयातील पाच कर्मचारींनी चाचपले.हा संपूर्ण प्रकार रुग्णालयातील सि.सि.टी.व्ही फुटेज मध्ये चित्रीत झाले.याबाबत मयत रुग्णाच्या नातेवाईकांना लक्षात आल्याने याबाबत नातेवाईकांनी तक्रार केल्यानंतर सि.सि.टी.व्ही फुटेज तपासल्यानंतर संपूर्ण प्रकार उघड झाला.याबाबत मयताचे मित्र दिपक रमेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीतून मयत माळी यांच्या खिशातून 30 हजार काढून घेतल्याने पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.