
बातमी कट्टा:- गेल्या पाच दिवसांपासून 71 वर्षीय आजीबाई उपोषणाला बसल्या आहेत.न्याय मिळावा यासाठी या आजीबाईंचे उपोषण सुरु आहे.पाणी व्यतिरिक्त काही एक त्यांनी सेवन केलेले नाही.न्याय मिळे पर्यंत कुठलाही उपचार करणार नसल्यावर आजीबाई ठाम आहेत काल आजींना रुग्णालयात दाखल कराव यासाठी शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले.मात्र बेळजरीने देखील आजीबाई रुग्णवाहीकेत बसल्या नाहीत.रात्री दोन तास पर्यंत त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी पोलीसांचा संघर्ष सुरु होता.उपोषण न सोडण्यावर आजीबाई ठाम आहेत.
शिरपूर तालुक्यातील उंटावद येथील 71 वर्षीय शांताबाई धुडकू महाजन या वृध्द महिलेच्या नावे सावळदे शिवारात शेती आहे.शांताबाई महाजन यांचे बँक ऑफ महाराष्ट्र शिरपूर शाखेत खाते आहे.शांताबाई यांनी 2014 साली रोजी 1 लाख 28 हजाराचे पिक कर्ज घेतले होते.त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान या योजनेसाठी शांताबाई महाजन यांनी ऑनलाईन अर्ज केले होते. त्याबाबतची नोंद साहाय्यक निबंधक कार्यालयात आहे. परंतु कर्ज माफी देण्यात आली नसल्याचे शांताबाई महाजन यांच्या लक्षात आले.त्यानंतर शांताबाई महाजन यांनी बँक ऑफ महाराष्ट्र आणि साहाय्यक निंबधक कार्यालयात चौकशीसाठी अर्ज दिला होता.त्यात असे लक्षात आले की,शांताबाई महाजन या छत्रपती शेतकरी सन्मान योजनेतील कर्जमाफी साठी पात्र असल्याचे समजले.
परंतु सदरची कर्जमाफी न देता शांताबाई यांच्या खात्यातून एकुण एक लाख व 28 हजार रूपये कर्जपोटी परस्पर वसूल केल्याचे आढळून आले.पैसे वसूल केल्याबाबत दोन्ही कार्यालयांना तगादा लावला असता महाराष्ट्र बँकेच्या अर्थे शाखेत शांताबाई महाजन यांना पाठविण्यात आले.जर शांताबाई महाजन यांचे खाते शिरपूर शाखेत आहे.तर त्यांना अर्थे शाखेत पाठविण्याचे कारण काय ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.त्यांची दिशाभूल करण्यात येत असल्याचे शांताबाई महाजन यांच्या लक्षात आले. कर्जमाफीच्या संबधीत व सक्तीच्या वसुली संबधीत सर्व दस्ताऐवज चौकशी अर्जासह दोन्ही कार्यालयात सादर केले.या प्रकरणात शांताबाई महाजन यांच्या अज्ञानपणाचा गैरफायदा बँक मेनेजर व साहाय्यक निबंधक यांनी घेतल्याचा आरोप शांताबाई यांनी यावेळी केला आहे.
याबाबत बँक खात्यातील परस्पर रक्कम वजावट करणे व कर्जमाफी नाकारणे याबाबत कर्जदार यांना लेखी किंवा तोंडी स्वरुपात अवगत केले नसल्याचे शांताबाई यांचे म्हणने आहे.याप्रकरणाची त्वरीत चौकशी करुन बँकेने खात्यातील परस्पर वजावट केलेली एक लाख 28 हजाराची रक्कम परत मिळावी व कर्जमाफीची एक लाख 48 हजार ही रक्कम माफ करण्यात यावी अशी मागणी शांताबाई यांनी केली होती.
दि 2 मार्च रोजी शिरपूर येथील बाजार समिती मधील साहाय्यक निबंधक कार्यालय समोर शांताबाई महाजन या वृद्ध महिलेने उपोषण सुरु केले आहे.गेल्या पाच दिवसांपासून त्यांचे उपोषण सुरुच आहे.त्यांना न्याय मिळेल का ? त्यांच्या उपोषणाची गेल्या पाच दिवसांपासून का ? दखल घेतली जात नसावी.असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.