
बातमी कट्टा:- दहशतवादी हल्याबाबत पोलीसांकडून सुरु असलेल्या मॉक ड्रील दरम्यान एका संतप्त झालेल्या व्यक्तीने मॉक ड्रील मधील बंदुकधारी दहशतवादीलाच कानशिलात मारल्याची घटना धुळे येथे घडली.अचानक मॉक ड्रील झाल्याने उपस्थित लहान मुले मुली घाबरत असल्याचे सांगत त्यान मारहाण केली.

धुळे पोलीस दलातर्फे शहरातील स्वामीनारायण मंदिर येथे मॉक ड्रिल घेण्यात आले होते.या मॉक ड्रील मध्ये शहरातील स्वामीनारायण मंदिरात दोन अतिरेकी शिरल्यानंतर धुळे पोलीस दलाच्या विशेष कमांडो पथकाने मंदिरात रेस्क्यू ऑपरेशन राबवत अतिरेक्यांना जेरबंद करण्याचे मॉक ड्रील सुरु असतांना यावेळी तेथील एक संतप्त नागरिकाने पुढे येऊन मॉक ड्रील मधील बंदुकधारी दहशतवादाच्या कानशिलात दिली. अचानक झालेल्या मॉक ड्रील मुळे लहान मुले घाबरली ते रडत असल्याचे सांगत त्याने कानशिलात दिली.यानंतर तात्काळ त्या व्यक्तीला पोलीसांनी बाहेर काढून त्याची समजूत काढली.