
बातमी कट्टा- दि.२३ ऑक्टोंबर रोजी रात्री १०:३० च्या सुमारास दोंडाईचा – नंदुरबार रस्त्यावर १३२ के व्ही सब स्टेशन समोर दोन मोटरसायकल यांची समोरासमोर धडक झाल्याची घटना घडली असून या अपघातात एक जण ठार तीन जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार दि.२३ ऑक्टोंबर रोजी रात्री १०:३० च्या सुमारास दोंडाईचा – नंदुरबार रस्त्यावर १३२ के व्ही सबस्टेशन समोर मोटरसायकलांची समोरासमोर धडक झाली.यात मोटारसायकल चालक मनोज नंदा माळी वय(४२) यांचा मृत्यू झाला तर मोटारसायकल चालक किशोर ठाकूरसह एक महिला व युवक दोन्ही जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी विज मंडळ कर्मचारी, डी जी नगर व अयोध्या नगर येथील नागरिकांनी अपघात ग्रस्त असलेल्या व्यक्तींना मदत करत उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले.
