मोटरसायकलीने जात असतांनाच बिबट्याचा हल्ला…

बातमी कट्टा:- शेतातून मोटरसायकलीने घरी परत येत असतांना बिबट्याने अचानक तरुणावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. प्रतिकार केल्यामुळे तरुणाचा सुदैवाने जिव वाचला आहे.

साक्री तालुक्यातील वसमार येथील दिनेश सोनवणे हा नेहमीप्रमाणे शेतात पाणी भरण्यासाठी रात्री गेला होता पहाटे तो मोटरसायकलीने घरी परत येत असतांना अचानक त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला.यावेळी आरडाओरडा झाल्यानंतर घटनास्थळी नागरीक धावले आरडाओरडा झाल्याने बिबट्या जंगलच्या दिशेने पसार झाला.जखमी तरुण दिनेश सोनवणे याच्यावर तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

वसमार गाव बिबट्याच्या दहशतीत आले आहे. बिबट्याचा लवकारात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी वसमार गावातील नागरिकांकडून केली जात आहे.

WhatsApp
Follow by Email
error: