बातमी कट्टा:- मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपुर सहकारी साखर कारखाना कॉलनी समोर दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मोटरसायकल चालकचा मृत्यू झाला आहे. सुकलाल कैलास ठाकरे वय 45 रा.राजमहली पो.कुंजरी ता निवाली जि.बडवाणी मध्यप्रदेश असे अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.अपघातानंतर घटनास्थळी हेल्पिंग हँड ग्रुपचे मयुर राजपूत यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले यावेळी अपघातग्रस्त व्यक्तीकडे असलेली 20 हजाराची रोकड व मोबाईल मयुर राजपूत यांनी जवळ ठेऊन सुरक्षित रित्या पोलीसांच्या स्वाधीन करय मानवतेचे दर्शन घडवले.

मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपुर सहकारी साखर कारखाना लगत कर्मचारी वसाहत समोर 15 फेब्रुवारी 2022 रोजी सुकलाल कैलास ठाकरे वय 45 रा.राजमहली पो.कुंजरी ता निवाली जि.बडवाणी मध्यप्रदेश हे दुपारी शिरपूर कडून सेंधवाकडे एमपी 46 एमव्ही 7630 क्रमांकाच्या दुचाकीने जात असतांना एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.या धडकेत सुकलाल ठाकरे हे गंभीर जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच हेल्पिंग हँड ग्रुपचे मयुर राजप यांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यांनी तात्काळ पोलीस कर्मचारी यांना संपर्क साधत महामार्ग रुग्णवाहीकेला बोलवून घेत सुकलाल ठाकरे यांना शिरपुर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.रुग्णालयातील डॉ.गुलाबराव पाटील यांनी तपासणी करून सुकलाल ठाकरे यांना मयत घोषित केले.
सुकलाल ठाकरे यांचा अपघात झाला त्यावेळी त्यांच्या खिशात 20 हजार 500 रुपयांची रोकड व मोबाईल होता.मयुर राजपूत यांनी ते पैसे व रोकड आपल्याकडे सुरक्षित ठेऊन शिरपूर तालुका पोलीसांच्या स्वाधीन करत मानवतेचे दर्शन घडवून दिले.