बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील चोपडा हिसाळे रस्त्यावर तरडी ते हिसाळे दरम्यान सकाळी दुचाकीला बोलेरो वाहनाने जोरदार धडक दिल्याने अपघात झाला असून अपघातात तरडी येथील राजेंद्र हिरामण पाटील वय 50 यांचा मृत्यू झाला आहे.
याबाबत प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार तरडी येथील राजेंद्र हिरामण पाटील हा दुकानदार असून शनिवारी सकाळी त्याच्या ताब्यातील दुचाकीने चोपडा रस्त्याने अनेर येथे बाजार व दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी जात असतांना हिसाळे कॉलनी समोर अज्ञात बोलेरो वाहनाने समोरून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला.या अपघातात राजेंद्र पाटील हे गंभीर जखमी झाले.त्यास खाजगी वाहनाने शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.डॉ.कदम यांनी मयत घोषित केले.याप्रकरणी थाळनेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे.