बातमी कट्टा:- मोटरसायकली चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या असून त्यांच्या ताब्यातून 8 लाख 30 हजार किंमतीचे चोरीचे 15 मोटरसायकली ताब्यात घेतले आहे. शिरपूर पोलीसांनी केलेल्या या उल्लेखनीय कामगिरी बद्दल शिरपूर शोध पथकाचे पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील यांनी अभिनंदन केले.
शिरपूर शहारासह तालुक्यात मोटरसायकल चोरीच्या प्रमाणात वाढ झाली होती.दि 14 रोजी दुपारच्या सुमारास भंडारी टॉकीज जवळ किशोर भिल यांची मोटरसायकल चोरी झाल्याची फिर्याद शहर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली होती.त्या मोटरसायकल चोरीचा शोध सुरु असतांना पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली त्या माहितीच्या आधारे शोध पथकाला कारवाईचे आदेश दिले यावेळी करवंद नाका परिसरात संशयित चुनिलाल उर्फ गणेश उर्फ गुंया भोल्या पावरा रा.बोरमळी व दत्तु उर्फ दिपक कुमाळ पावरा रा.बोरमळी पो.भोईटी ता. शिरपूर या दोघांना ताब्यात घेतले.त्या दोघांना विचारपूस केली असता त्यांच्या ताब्यातून शिरपूर, चोपडा,जळगाव तसेच इतर ठिकाणांहून चोरलेल्या 8 लाख 30 हजार किंमतीचे एकुण 15 मोटरसायकली पथकाने ताब्यात घेतले आहे.शिरपूर पोलीसांनी
सदरची कारवाई शोध पथकातील ललित पाटील, लादुराम चौधरी,गोविंद कोळी,विनोद अखडमल,प्रवीण गोसावी,मुकेश पावरा,प्रशांत पवार ,होमगार्ड मिथुन पवार,चेतश भावसार,राम भिल,शरद पारधी आदींनी केली आहे.