बातमी कट्टा:-दोन मोटरसायकलींमध्ये समोरासमोर धडक झाल्याची घटना काल दि 30 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली आहे. या भीषण अपघातात मोटारसायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.जखमी दोन बालकांचा समावेश आहे.
शिरपूर-शहादा रस्त्यावर वरूळ जवळील पेट्रोल पंपाजवळ दोन मोटरसायकलींचा अपघात घडला आहे. या अपघातात हरकलाल बाबूलाल चव्हाण यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर भारतीबाई हरकलाल चव्हाण , स्वामी हरकलाल चव्हाण वय 7,शर्वरी हरकलाल चव्हाण वय 9 रा.बलकुवे आणि सचिन छोटू पाटील रा.भटाणे ता शिरपूर हे गंभीर जखमी झाले आहेत.
हरकलाल चव्हाण हे शिरपूर शहादा रस्त्याने भटाणे कडून आपल्या परिवारासह बलकुवे कडे येत असतांना भटाणे येथील सचिन पाटील याने भरधाव वेगाने एम एच 18 एएच 5478 क्रमांकाची हरकलाल चव्हाण यांच्या मोटरसायकलीला समोरून जोरदार धडक दिली.यात हरकलाल बाबूलाल चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी व दोन मुले आणि धडक देणारा सचिन पाटील हा गंभीर जखमी झाला अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता हरकलाल चव्हाण यास डॉक्टरांनी मयत घोषित केले तर जखमींवर तात्काळ उपचार सुरू केले.पुढील तपास पोहेकॉ मनोज साठे करीत आहे.याबाबत शिरपूर शहर पोलीस ठाण्यात खबर दिल्याने वाहन अपघात व अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.