मोटारसायकल अपघातात दोन जणांचा मृत्यू,महिला व तरुणाचा अपघातात मृत्यू तर एक महिला जखमी….

बातमी कट्टा:– शिरपूरकडे मोटरसायकलीने येत असतांना अपघातात महिला आणि तरुणाचा जागिच मृत्यू झाला असून एक महिला जखमी झाल्याची घटना काल दि 30 रोजी सायंकाळी घडली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार अनरदबारी – शिरपूर रस्त्यादरम्यान अनरदबारी गावाजवळ अपघाताची घटना घडली. शिरपूर तालुक्यातील शिंगावे येथील एक तरुण व दोन महिला एकाच मोटरसायकलीने शिरपूरकडे येत असतांना अनरदबारी गावाजवळ अपघात झाला यात तरुण आणि महिलेचा जागिच मृत्यू झाला आहे. तर एक महिला जखमी झाली आहे.मृतांना शहादा तालुक्यातील सारंखेडा आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले तर जखमी महिलेवर म्हसावद आरोग्य केंद्रावर उपचारासाठी दाखल करण्यात आले.त्यांची रात्री उशिरापर्यंत ओळख पटू शकलेली नव्हती.मयतांमध्ये आई आणि मुलाचा मृत्यू झाला असावा व मयताची पत्नी जखमी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे आहे.अपघात कसा झाला याबाबत माहिती मिळु शकलेली नाही.

WhatsApp
Follow by Email
error: