मोटारसायकल चोरीच्या संशयितातून दोघांना पब्लिक मार

बातमी कट्टा:- मोटरसायकल चोरी करत असल्याचा संशयातून दोन जणांना ग्रामस्थांनी चोप दिल्याची घटना काल दि 7 रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे. यात दोघेही जणांना दुखापत झाली असून उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

शिरपूर तालुक्यातील सांगवी येथून मोटरसायकली चोरीचे मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग लगत सांगवी गाव असल्याने चारचाकी वाहन देखील चोरी झाल्याचे घटना येथे घडली आहे.यामुळे येथील ग्रामस्थ सतर्क झाले होते.काल दि 7 रोजी रात्रीच्या सुमारास सांगवी येथे दोन तरुण बसस्थानक परिसरात संशयितरित्या फिरत असल्याचा संशय तेथील ग्रामस्थांना आला.दोन्ही तरुण मोटरसायकल चोर असल्याच्या संशयावरून उपस्थिती लोकांनी दोघांना मजबूत चोप दिला.त्या दोन्ही तरुणांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.दोन्ही तरुण अमळनेर येथील असून दोंघांना मारहाण झाल्याने दुखापत झाली होती.दोघांनाही मोटरसायकल चोर असल्याचा संशयतातून मारहाण झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: