बातमी कट्टा:- मोबाईलवर बोलत असतांना पल्सर मोटारसायकलीने भरधाव वेगाने येणाऱ्या संशयितांनी मोबाईल हिसकावून घटनास्थळावरून पसार झाले होते. अखेर त्या संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत त्यांच्याकडून 1 लाख 47 हजार किंमतीचा मुद्देमाल केला जप्त केला आहे.
दि 7 जानेवारी रोजी निमडाळे येथील मयुर संजय पाटील यांनी देवपूर पोलीस स्टेशनात तक्रार दिली होती की,दि 6 रोजी मयुर पाटील धुळे शहरातील वाडीभोकर रोडवर निकुंभे हॉस्पिटल समोर सार्वजनिक जागी मोबाईल बोलत असतांना त्यांच्या पाठीमागे पल्सर मोटारसायकल येऊन संशयितांनी मयुर पाटील यांचा मोबाईल हिसकावून पसार झाले.याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून संशयितांचा शोध सुरु असतांना पथकाने मोहाडी उपनगर येथील खुशाल ऊर्फ मनोज अशोक मोकळ,कुणाल अर्जून गवळी रा.गवळीवाडा मोगलाई रोड, व रितीक अमरसिंग पंजाबी रा.कोळवलेनगर मालेगाव रोड धुळे आदींना ताब्यात घेतले असतांना त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.पथकाने 80 हजार किंमतीची पल्सर मोटरसायकल व 65 हजार किंमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे एकुण 9 अँड्रॉइड मोबाईल असा एकुण 1 लाख 47 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत ,प्रकाश पाटील,योगेश राऊत,बाळासाहेब सुर्यवंशी, रफिक पठाण, संदीप सरग,गौतम सपकाळे, राहुल सानप,कैलास महाजन आदींनी केली आहे.