बातमी कट्टा:- वृध्द व्यक्तीचा खून झाल्याची घटना दि 17 रोजी सायंकाळी घडली आहे.गळा चिरुन निर्दयी खून केल्याने मुंडके धडावेगळे झाल्याचे आढळून आल्याची खळबळजनक घटना घडली आहे.याबाबत पिंपळनेर पोलीसांकडून कसून तपास सुरु आहे.दोन दिवसात धुळे जिल्ह्यात खूनाची ही तिसरी घटना घडली आहे.

साक्री तालुक्यातील वार्सा येथील नवशा पांडू बोनवणे या 75 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा शेतात मृतदेह आढळून आला. घटनास्थळी मृतदेहाचे मुंडकेच छाडल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.मानेवर घाव केल्याने नवशा सोनवणे यांचे धडावेगळे शिर गावालगत असलेल्या शेतात आढळून आले आहे.हा मृतदेह एका शेतातून दुसऱ्या शेतात फरफटत आणल्याचे सांगितले जात आहे.घटनास्थळी पोलीसांनी धाव घेत चौशकी सुरु केली आहे.
या 75 वर्षीय वृद्धाचा ईतका निर्दयीपणे खून कोणी व का ? केला असावा याचा पिंपळनेर पोलीसांकडून शोध सुरु आहे.काल दि 17 रोजी सायंकाळी सदर घटना उघडकीस आली आहे.दोन दिवसात खूनाची जिल्ह्यातील ही तिसरी घटना आहे.
