यात पोलिसांची काय चुक ?दगडफेकीत “पोलिस” टार्गेट का ?

बातमी कट्टा:- करवंद गावात खूनाची घटना घडली होती.यात खून करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्या घटनेच्या सकाळी करवंद येथून आक्रमक पणे मोर्चा शिरपूर शहर पोलिस स्टेशनवर धडकला.पोलिसांनी ताब्यात घेतलेला आरोपी आमच्या ताब्यात द्या अस मोर्चेकरी म्हणत होते. पोलिसांकडून वारंवार समजवण्यात येत असतांना अचानक पोलिसांच्या दिशेने दगडांचा मारा सुरु झाला.या दगडफेकीत पाच पोलिस जखमी झाले.पोलिसांची अशी काय चुकी होती की त्यांच्यावर बेभान पणे दगडफेक करण्यात आली  ?

संविधानाने आपल्या रक्षणासाठी पोलिस प्रशासनाची स्थापना केली आहे.आपले संरक्षण व्हावे कायदा सुव्यवस्था सुरक्षित रहावी यासाठी पोलिस काम करत असतात. उन वारा पाऊस हेच काय कोरोना सारख्या आजारांमध्ये कोणी कोणाला ओळखत नव्हते तेव्हा आपला जिव धोक्यात घालून पोलिसांनी आपले रक्षण केले.जिव मुठीत घेऊन काम करणारे हे पोलिस काही रोबोट किंवा देवाने स्पेशल घडवलेले नसतात तर ते देखील मानवच आहेत हे लक्षात असणे आवश्यक आहे.

शिरपूर तालुक्यातील करवंद गावात काल रात्री खून झाल्याची घटना घडली. खूनाच्या घटनेनंतर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले.घटनेच्या सकाळी करवंद येथून पायी मोर्चा निघला.यांच्यासोबत शिरपूर शहर पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी व कर्मचारी देखील उपस्थित होते.

मोर्चा हा शिरपूर शहर पोलिस स्टेशनवर येऊन धडकला यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित आरोपी आमच्या ताब्यात द्या अशी मागणी मार्चेकरी करु लागले. पोलिसांकडून समजवण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. मोर्चेकरी थकले असतील म्हणून पोलिसांनी मोर्चेकरांना पिण्यासाठी पाणी दिले.त्यानंतर मात्र अचानक मोर्चेकरी आक्रमक झाले आणि शिरपूर शहर पोलिस स्टेशनवर पोलिस उभे असलेल्या दिशेने दगडफेक झाली.यात चार ते पाच पोलिस गंभीर जखमी झाले.दगडफेकीत बालंबाल पोलिस बचावले.यानंतर अश्रु नळकांड्या फोडत पोलिसांनी गर्दी पांगवली जखमी पोलिसांना शिरपूर येथीला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.यात तीन ते चार जखमी महिला पोलिसांचा समावेश आहे.पोलिसांना देखील मुल बाळ आहेत.त्यांना देखील आपला संसार आहे.आणि मुळात या घटनेत पोलिसांची अशी कुठली चुकी होती की त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली ? खूनाच्या या घटनेत पोलिसांना का टार्गेट करण्यात आलं ? ज्या पोलिसांनी पायपीट करुन थकले असतील म्हणून पोलिस स्टेशनच्या गेटवर मोर्चेकरांना पिण्यासाठी पाणी दिले त्याच पोलिसांवर का दगडफेक करण्यात आली ? पोलिस स्टेशनच्या गेटवर येऊन त्यांच्यासोबत बोलून रोष व्यक्त झाला होता मग दगडफेक का ? पोलिसांवर झालेल्या या दगडफेकीत कोणाचा तरी भाऊ ,वडील किंवा आई बहिणीला आपला जिव गमवावा लागला असता.पोलिस आपल्यातीलच आहेत हे लक्षात असणे आवश्यक आहे.

WhatsApp
Follow by Email
error: