बातमी कट्टा:- मी धुळ्याला येणे आणि माझ्या मतदार संघामध्ये रावराणेंच असणं आणी येथे येऊन महाराणा प्रतापांच्या या कार्यक्रमात उपस्थित राहणे यापेक्षा मोठे भाग्यचे क्षण माझ्यासाठी कुठलाच नाही असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी विरपुरुष महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा दरम्यान केले.

धुळे येथे विरपुरुष महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा दि 31 रोजी सायंकाळी पार पडला.या कार्यक्रमाप्रसंगी आमदार नितेश राणे,खासदार सुभाष भामरे,आमदार जयकुमार रावल,महापौर चंद्रकांत सोनार,अनुप अग्रवाल, सभापती संजय जाधव,अजित राजपूत,तेजपाल राजपूत, प्रदिप कर्पे,प्रतिभा चौधरी आदी जण उपस्थित होते.
या वेळी कार्यक्रमात बोलतांना आमदार नितेश राणे म्हटले की,मी ज्या मतदार संघात निवडून येतो त्या मतदार संघात वैभववाडी म्हणून तालुका आहे. वैभववाडी तालुका हा संपूर्ण रावराणेंचा आहे.आणि रावराणे हे माहाराणा प्रताप यांच्या पुर्ण प्रवासाचे महत्त्वाचे घटक आहे.म्हणजे मी धुळ्याला येणे आणि माझ्या मतदार संघामध्ये रावराणेंच असणं आणी येथे येऊन महाराणा प्रतापांच्या या कार्यक्रमात उपस्थित राहणे यापेक्षा मोठे भाग्यचं क्षण माझ्यासाठी कुठलाच नसेल.वैभववाडी येथे काही वर्षांपूर्वी महाराणा प्रतापांच्या देशातले दुसऱ्या क्रमांकाचे कलादालनाचे उदघाटन केले.यासाठी महाराणा प्रतापांचे वंशज, छत्रपती संभाजी राजे,जयकुमार रावल यांना निमंत्रण देऊन कलादानाचे उदघाटन केले.आणि त्या कलादानाला चार वर्ष पुर्ण झाले आहेत.योग्य वेळी योग्य ठिकाणी पोहचणे हे महत्वाचे आहे असे यावेळी आमदार नितेश राणे यांनी आपले मत व्यक्त केले.