
बातमी कट्टा:- धुळे जिल्ह्यातील साक्री शहरात एका घरावर दरोडेखोरांनी शस्त्र दरोडा टाकत सोने चांदिचे दागिन्यांसह घरातील तरुणीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास घटना घडली असून चाकू आणि गावठी पिस्तूलचा धाक दाखवत घरातील सदस्यांना मारहाण देखील करण्यात आली आहे.या घटनेमुळे मात्र संपूर्ण धुळे जिल्हा हादरला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार साक्री शहरातील विमलबाई कॉलेज मागे असलेल्या परिसरात एका घरावर रात्री पाच ते सात दरोडेखोरांनी दरोडा टाकला. यावेळी घरातील सदस्यांना चाकू तसेच गावठी पिस्तूलचा धाक दाखवत दरोडेखरांनी मारहाण केली. सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह यावेळी दरोडेखोरांनी आपल्या आत्याकडे आलेल्या 23 वर्षीय तरुणीला देखील सोबत उचलून नेले.या घटनेमुळे साक्री शहरात संपूर्ण धुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
व्हिडीओ बघण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://youtu.be/es2mlf1NlII?si=7KPDnCselnCWVz1U
या घटनेनंतर साक्री शहर पोलीस ठाण्यामध्ये दरोड्याच्या गुन्ह्यासह अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . दरम्यान दरोड्याच्या घटनेची माहिती मिळताच साक्री शहर पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.याबाबत पोलीसांकडून शोध सुरु आहे.
व्हिडीओ बघण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://youtu.be/es2mlf1NlII?si=7KPDnCselnCWVz1U
