कुरखळी बातमीकट्टा प्रतिनिधी :- स्वातंत्र्याची ७५ वर्षपूर्ती निमित्त शासनाकडून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष निमित्त ग्रामपंचायत कुरखळी ता शिरपूर जि धुळे येथे स्वच्छता हिच सेवा, शाश्वत स्वच्छता, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता, आरोग्याचे शास्त्रीय शिक्षण, याबाबत श्री प्रदिप पवार उप मुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता मिशन, जि प धुळे व श्री अशोक कुमार मेघावल जिल्हा युवा अधिकारी,नेहरू युवा केंद्र संघटन धुळे, युवा व खेळ मंत्रालय भारत सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोज। करण्यात आले होते.
महाश्रमदानातून स्वच्छता, स्वच्छते कडुन ग्रामसमृध्दी कडे हा मुल मंत्र जोपासत सार्वजनिक स्वच्छता संकल्प या ग्रामपंचायतीने, नागरिकांनी युवकांनी व विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची शपथ घेऊन उपक्रमात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला.आझादी का अमृत महोत्सव वर्ष निमित्त गावातील कुरखळी ग्राम सर्वांगीन विकास मंच व ग्रामस्थांनी परिसरात स्वच्छता अभियान राबविले. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून गावातील प्लास्टिक कचरा बायो कॅरीबॅग मध्ये गोळा केला. व त्यांना त्या पिशवीचे महत्त्व पटवून दिले.
कुरखळी ग्रामसर्वांगीन विकास मंच व ग्रामस्थांनी या राष्ट्रीय सेवेत स्वतःला सिद्ध करण्यासाठी संकल्प केला आहे.
गावात स्वच्छता, आरोग्य कायमस्वरूपी नांदावे म्हणून प्लॅस्टिक मुक्त पंचायत करण्यासाठी घरोघरी जाऊन संदेश देण्यासाठी स्वच्छता दूत म्हणून, आरोग्याचे स्वयंसेवक म्हणून काम एक जूटीने करण्याचा निर्धार घेत सामूहिक शपथ घेतली.
या सामाजिक उपक्रमात नेहरू युवा केंद्र धुळे, युवा व खेल मंत्रालय भारत सरकार अंतर्गत तालुका युवा समन्वयक गणेश चौधरी, तालुका युवा समन्वयक प्रियंका पावरा, कुरखळीचे सरपंच सीताराम भिल, उपसरपंच, ग्रामसेवक व्ही बी चव्हाण, माजी उपसरपंच अवधूत मोरे, पोपट शिरसाठ, ग्रा प सदस्य जगदीश मोरे, सुरेश मोरे, आदेश भिल, कुरखळी ग्रामसर्वांगीन विकास मंचचे योगेश्वर मोरे, मनीष मोरे, अंगणवाडी सेविका संध्या मोरे, सीमा साळुंखे, उपशिक्षिका नेरकर मॅडम, पोलीस पाटील वसंत धनगर, रोकड कोळी, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रघुनाथ गित्ते व माध्यमिक विद्यालयातील प्रतिनिधी ए पी माळी , नेहरु युवा केंद्र धुळे जिल्ह्यातील स्वंयसेवक व युवा मंडळ अध्यक्ष जितेंद्रसिंह राठोड, युवा नेतृत्व अनिकेत बोरसे व गौरव पावरा त्यांचे सहकारी उपस्थित होते.