बातमी कट्टा : शिवसेना-युवतीसेनेतर्फे शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे शनिवार दि.21 ऑगस्ट रोजी शिंदखेडा पोलीस स्टेशन पोलीस बांधवांना व शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसैनिकांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.
युवतीसेनेच्यावतीने दरवर्षी एक दिवसा आधीच रक्षाबंधन सणाचा कार्यक्रम घेण्यात येतो. शिवसैनिकांना रक्षाबंधन निमित्त शिवबंधन बांधणे तसेच सातत्याने जनतेची सेवा करणाऱ्या पोलीस बांधवांना देखील रक्षाबंधनानिमित्त राखी बांधण्यात येते. यावर्षी देखी हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी युवतीसेनेच्या जिल्हायुवती अधिकारी सौ.शिवानी दीपक पवार, महिला आघाडीच्या तालुका उपसंघटिका सौ.अलका अरविंद कापुरे, युवतीसेना शहर प्रमुख रवीना गणेश परदेशी, तालुका युवती अधिकारी चारुशीला नरेंद्र साळुंखे, रुबीना मुनीर पिंजारी, वंदना धोंडू पवार, युवासेना उपजिल्हाप्रमुख गणेश परदेशी, तालुका समन्वयक विनायक पवार, शिवसेना शहरप्रमुख संतोष देसले, युवासेना तालुकाप्रमुख प्रदीप पवार, युवासेना शहरप्रमुख योगेश माळी, युवासेना विभाग प्रमुख विशाल ठाकरे, दीपक पवार, दिनेश साळुंखे आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक सुनील भाबड, पोलीस उपनिरीक्षक गजानन गोटे, यांच्यासह सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस ठाण्यात तर शिवसेनेच्या शिवसंपर्क कार्यालयात शिवसैनिकांना रक्षाबंधन निमित्त शुभेच्छा देऊन राख्या बांधण्यात आल्या.