बातमी कट्टा:- पीएम किसान योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी तक्रादराकडून ३०० रुपयांची लाच स्विकारतांना धुळे तालुका कृषी कार्यालयातील डेटा ऑपरेटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाने रंगेहाथ अटक केली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार तक्रार हे नाशिक येथे राहत असून त्यांची धुळे तालुक्यातील पुरमेपाडा येथे वडीलोपार्जीत शेत जमीन असून तक्रादाराच्या आई यांना पि एम किसान योजनेचा लाभ मिळत होता.मात्र सन २०१९ साली आई मयत झाल्याने सदरचा लाभ मिळणे बंद झाला याबाबत तक्रादाराला पिएम किसान योजनेचा लाभ मिळावा यासाठी दोन वर्षांपूर्वी ऑनलाइन करण्यात आला होता त्या ऑनलाइन पडताळणचे काम धुळे तालुका कृषी विभागाकडे देण्यात आला होता.तक्रादार यांना तालुका कृषी कार्यालय धुळे येथील डेटा ऑपरेटर सुनिल रामदास सुर्यवंशी यांनी तक्रादार यांना फोन करुन कागदपत्रे वॉटसअपवर मागवले यावेळी काम करुन देण्यासाठी पैसे लागतील असे डेटा ऑपरेटर यांनी तक्रादार यांना सांगितले. त्याबाबत तक्रादार यांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार केली व धुळे तालुका कृषी कार्यालयात सापळा लावला असता डेटाऑपरेटर याने तीनशे रुपयांची मागणी करुन तीनशे रुपये लाचेची रक्कम स्विकारतांना डेटाऑपरेटर सुनिल सुर्यवंशी याला लाचलुचपत विभागाच्या धुळे पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले.
सदरची कारवाई लाचलुचपत विभागाच्या धुळे पथकातील पोलीस उप अधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे,पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण तसेच राजन कदम,शरद काटके,भुषण शेटे,प्रशांत बागुल,गायत्री पाटील, संतोष पावरा,संदिप कदम,रामदास बारेला,रोहिणी पवार,प्रविण पाटील, मकरंद पाटील,सुधीर मोरे,जगदीश बडगुजर आदींनी कारवाई केली आहे.