बातमी कट्टा:-मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपूलाखाली अज्ञात व्यक्तीचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे.घटनास्थळी पोलीसांनी धाव घेत चौकशी सुरु केली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार आज मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मोहाडी उडाणपूलाखाली भिक्षा मागणाऱ्या पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे.रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृतदेहाची अद्याप ओळख पटू शकलेली नसून घटनास्थळी पोलीस प्रशासनासह फॉरेन्सिक पथक व फिंगर प्रिन्टचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.उशिरापर्यंत कारवाई सुरु होती.
