रस्त्याच्याकडेला असलेल्या चारीत आढळला मृतदेह…..

बातमी कट्टा:- रस्त्याच्याकडेला असलेल्या चारीत 40 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे.सदर व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले असून जवळच अपघातग्रस्त मोटारसायकल मिळून आली आहे. याबाबत सोनगीर पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे तालुक्यातील रामी शिवारात लामकानी – सरवड मार्गावरील रामी फाट्यानजीक रस्त्याच्या चारीत काल दुपारी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता.घटनास्थळी एम एच 18 एएस 1961 क्रमांकाची अपघातग्रस्त मोटरसायकल देखील मिळुन आली होती.अपघातात सदर व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.

घटनास्थळी सोनगीर पोलीस स्टेशनचे पोलीस पथक दाखल होत चौकशी केली असता सदर मृतदेह नंदुरबार जिल्ह्यातील घोटाणे येथील रहिवासी तुकाराम सिताराम यांचा असल्याचे निष्पन्न झाले.मयत तुकाराम हे दि 10 रोजी घरातून निघून गेले होते. मात्र ते घरी परत आले नव्हते नातेवाईकांकडून त्यांचा शोध सुरु होता.मात्र काल दि 13 रोजी त्यांचा मृतदेह धुळे तालुक्यातील रामी शिवारातील रस्त्यालगतच्या चारीत मिळून आला.अज्ञात वाहनाच्या धडकेत शुक्रवारी हा अपघात घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत सोनगीर पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: