रस्त्यावर उभा असलेल्या ऊसाच्या ट्रॅक्टर मध्ये भरधाव बस धडकली…

बातमी कट्टा:- ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरचे टायर पंक्चर झाल्याने ट्रॅक्टर रस्त्यावर उभा असतांना मागून येणाऱ्या भरधाव एसटी बसने ट्रॅक्टरला जाऊन धडकला या अपघातात वाहक, चालकासह विद्यार्थी जखमी झाले आहेत.यात विद्यार्थ्यांसह २१ जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शहादा तालुक्यातील खैरवे शहादा ही मुक्कामी बस आज दि १० रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास खैरवे येथून सारंगखेडा मार्गे शहादा जात असतांना सारंगखेडा ते शहादा रस्त्यावरील मा.सप्तशृंगी पेट्रोल पंपाच्या काही अंतारावर ऊसाने भरलेला ट्रॅक्टरचा टायर पंक्चर असल्याने ऊसाने भरलेला ट्रॉलीसह ट्रॅक्टर रस्त्यावर उभा शहादा कडे जाणाऱ्या बसने उभ्या ट्रॅक्टर मागून धडक दिली.या अपघातानंतर बस मधील विद्यार्थी प्रवासींसह २१ जण जखमी झाले जखमींना सारंगखेडा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तर गंभीर जखमींना शहादा येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सारंगखेडा परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.

WhatsApp
Follow by Email
error: