बातमी कट्टा:- रस्त्यावर चालत असलेल्या व्यक्तीच्या तोंडावर कपडा टाकत ढकलत ढकलत जवळील उसाच्या शेतात घेऊन जात हाताबुक्यांनी मारहाण करत त्याच्याकडे असलेल्या दोन्ही हातातील 1 लाख 41 हजार किंमतीचे 6 सोन्याच्या अंगठ्या हिसकावून लूट करत तीन संशयित शेतातून पळून गेल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार दि 23 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास निम्स कॉलेज येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत अससलेले समीर निरंजन मित्रा वय 62 वर्ष रा.खाणपूर रोड हल्ली मु.बॉईज हॉस्टेल निम्स कॉलेज सावळदे ता.शिरपूर हे रात्री सावळदे येथील कृष्णा हॉटेल सावळदे जवळील उत्तम अनिल पाल याच्या घरी जेवण करून सावळदे शिंदखेडा रस्त्याने पायी रुमवर जात असतांना आर.सी.पटेल हायस्कूल सावळदे च्या गेट समोर पाठीमागुन तिन अज्ञात संशयित आले त्यांनी प्राध्यापक समीर मित्रा यांच्या तोंडावर कपडा टाकून ढकलत ढकलत ऊसाच्या शेतामध्ये घेऊन गेले व खाली पाडून दोन संशयितांनी धरुन ठेवले व हाताबुक्यांनी मारहाण करत एका संशयितांने प्राध्यापक समीर मित्रा यांच्या दोन्ही हातातील 1 लाख 41 हजार किंमतीच्या 6 सोन्याच्या अंगठ्या काढून घेत धक्का मारून अंधाराचा फायदा घेत शेतातून पळुन गेले. तेथून प्राध्यापक समीर मित्रा हे निम्स कॉलेज गेटवर पोहचून तेथून उपचारासाठी इंदिरा मेमोरियल हॉस्पिटल येथे दाखल झाले.याबाबत शिरपूर शहर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिरपूर शहर पोलिसांनी काहींना चौकशी साठी ताब्यात घेतले आहे.याबाबत चौकशी सुरु असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.