राजपूत समाजा बदल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या लक्ष्मण हाके यांच्यावर कारवाई करा – शिरपूर तालुका क्षत्रिय राजपूत समाजाचे तहसीलदारांना निवेदन

बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील क्षत्रिय राजपूत समाजाच्या वतीने सोलापूर येथील स्वतःला ओबीसी नेता म्हणणारा लक्ष्मण हाके याने राजपूत समाज आरक्षणाबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल आज महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना शिरपूर तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की लक्ष्मण हाके हे ओबीसी आरक्षणाच्या नावाखाली समाजा समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत. हाकेच्या चुकीच्या विधानामुळे महाराष्ट्रातील राजपूत समाजात प्रचंड रोष निर्माण झाला आहे यासाठी त्याच्यावर शासकीय स्तरावर आपल्या माध्यमातून तात्काळ योग्य ती कारवाई करावी. तसे न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला सर्वस्वी जबादार लक्ष्मण हाके व प्रशासन राहील असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

लक्ष्मण हाकेचे म्हणणे आहे की आम्ही ओबीसींचे आरक्षण वाचविण्यासाठी लढा उभारला आहे. कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश होऊ देणार नाही. यात हाकेने राजपूत भामटा समाज ओबीसी आरक्षणात घुसखोरी करण्याबाबत व इतर समाज भावना दुखवतील असे वक्तव्य केले.

निवेदन देतेवेळी रामसिंग उमेदसिंग राजपूत, बोरगांव सरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया, राष्ट्रीय करणी सेनेचे भरतसिंग राजपूत, विरपाल राजपूत, जातोडा मा सरपंच जयसिंग राणा, धीरज पवार, नितीनसिंह राणा, जयपाल राजपूत, शुभम राजपूत, हर्षदीप राजपूत,हरीश, गोरख, बबन व समाज बांधव उपस्थित होते.

WhatsApp
Follow by Email
error: