बातमी कट्टा:- जबरदस्तीने वाहनात बसवून अपहरण केलेल्या राजस्थान मजूराची धुळे तालुका पोलीसांनी शिताफीने शोध घेत त्याची सुटका करत तीन संशयितांना मध्यप्रदेश राज्यातून ताब्यात घेतले आहे.मोबाईल लोकेशनचा आधार घेत पोलीसांनी 24 तासात अपहरणकर्त्या तरुणाची सुटका करण्यात पोलीसांना यश आले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे शहरातील भूमिगत केबलचे काम करणाऱ्या भुरसिंग रमेशचंद्र जोगी रा.राजस्थान या मजूराला अज्ञात तीन संशयितांनी चारचाकी वाहनात जबरदस्तीने बसवून अपहरण केल्याची घटना घडली याबाबत धुळे तालुका पोलीस स्टेशन अपहरण बाबत गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी तात्काळ अपहरणकर्त्याचा शोध सुरु करत चौकशी सुरु केली.भुरसिंग जोशी या मजूराचे अपहरण का झाले व कोणी केले याबाबत पोलीसांकडुन तपास सुरु होता.मजुराकडे मोबाईल नसल्याने शोध घेणे देखील अडचणीचे झाले होते.या दरम्यान आरोपीच्या मोबाईलवरुन भुरसिंग जोगी यांनी धुळ्यातील एका मजुराला संपर्क केला होता.याच नंबर वरुन पोलीसांनी ट्रॅक करत मध्यप्रदेश राज्यातील ग्वाल्हेर नजीकच्या मुरैना परिसरात भुरसिंग जोशीचा ट्रॅक लागला.त्यानुसार पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे,उपनिरीक्षक राजश्री पाटील,राकेश मोरे,कांतीलाल शिरसाट,योगेश पाटील, नितीन दिवसे आदींनी मुरैना ग्वाल्हेर परिसरात जाऊन छापा टाकत अपहरण केलेल्या भुरसिंग जोगीक्षया मजुराची सुटका करत विजेंद्र बाबूलाल यादव,हरीसिंग किशोरीलाल जोगी,हैत्राम जोगी या तिघांना पोलीसांनी ताब्यात घेतले.