बातमी कट्टा:- स्कार्पियो वाहनात गावठ्ठी पिस्तूलांसह जिवंत काडतूसे खरेदी करुन राजस्थान येथे घेऊन जात असलेल्या राजस्थान येथील दोन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या धुळे पथकाने शिताफीने ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यात 6 लाख 1 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना गोपणीय माहीती प्राप्त झाली होती त्या माहितीच्या आधारे दि 23 रोजी सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे धुळे पथक शिंदखेडा तालुक्यातील चिलाणे गावाजवळ रस्त्यावर सापळा रचला असता पोलिसांना जी.जे 08 बी.बी 5059 क्रमांकाची स्कार्पियो वाहन येतांना दिसली पोलिसांना वाहनाला थांबवले असता वाहनातील दोघे संशयित पळुन जात असतांना पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता वाहनातील ड्रायव्हर सिटच्या चेचीस मध्ये तयार केलेल्या कप्पांमध्ये 44 हजार किंमतीचे दोन गावठी पिस्तूल मँगझीनसह,12 हजार किंमतीचे गावठी पिस्तुल मँगझीनसह,3 हजार किंमतीची स्टील बॉडी असलेली मँगझीन व 16 हजार किंमतीचे 16 जिवंत राऊंड(काडतूसे) पोलीसांना मिळुन आली.

पोलिसांनी दोघांना नाव विचारले असता कंवराराम केसाराम जाट वय 27 रा अनदानी जि.बाडमेर राजस्थान व विक्रसिंह भवरसिंह राजपूत वय 21 रा.ता.शेरगढ जि.जोढपूर राजस्थान असे सांगितले पोलीसांनी दोघांना ताब्यात घेत स्कार्पियो वाहनासह 6 लाख 1 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे धुळे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत,योगेश राऊत,सुशांत वळवी,प्रकाश सोनार,संजय पाटील,संदीप सरग,कुणाल पानपाटील,उमेश पवार,विशाल पाटील,कैलास महाजन आदिंनी केली आहे