
बातमी कट्टा:- शिरपूरात चोरांनी हद्द पार केली असून मोटरसायकल चारचाकी चोरी करता करता आता ट्रॅक्टर चोरीकडे चोरांनी मोर्चा वळविला आहे.शिरपूर तालुक्यात एकाच रात्रीत दोन ट्रॅक्टर चोरी झाले यातील एक ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला नाल्यात पलटी झाल्याने ते मिळून आले आहे. तर दुसरे ट्रॅक्टर धुळ्यात मिळुन आले आहे.या घटनेमुळे मात्र तालुक्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार आज दि 23 रोजी रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टर चोरीची घटना घडली आहे.शिरपूर शहरातील पित्रैश्वर कॉलनी येथील सुनिल युवराज राजपूत यांनी दोन दिवसांपूर्वी महिंद्रा 555 कंपनीचे लाल ट्रॅक्टर खरेदी करून घरी आणले होते.रात्री सुनिल राजपूत यांनी घराबाहेर ट्रॅक्टर उभे केले होते.मात्र पहाटे ट्रॅक्टर चोरी झाल्याचे लक्षात आले.या दरम्यानच शिरपूर तालुक्यातील चांदपुरी येथील रहिवासी किशोर छगन पटेल यांच्या मालकीचे न्यु स्वराज 644 कंपनीचे ट्रॅक्टर गावातून चोरी झाल्याची घटना घडली.
चोरीच्या घटनेनंतर शोध कार्य सुरु केले असता वनावल ते चांदपुरी रस्त्यावर दोन किमी अंतरावर नाल्यामध्ये किशोर पटेल यांचे ट्रॅक्टर पलटी झालेल्या अवस्थेत ट्रॅक्टर मिळुन आले.तर पित्रेश्वर कॉलनीतील सुनिल राजपूत यांचे ट्रॅक्टर धुळे येथील आर्वी जवळ सापडल्याचे समजले आहे.