राष्ट्रगौरव महाराणा प्रतापसिंहजी यांच्या जयंतीनिमित्त धुळे येथे बैठक संपन्न

बातमी कट्टा:- राष्ट्रगौरव महाराणा प्रतापसिंहजी यांच्या जयंतीनिमित्त धुळे येथे राष्ट्रगौरव महाराणा प्रतापसिंहजी स्मारक समितीच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी दरबारसिंह राजपूत व स्वागत अध्यक्ष पदी निलेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रगौरव महाराणा प्रताप यांची दि 09 मे रोजी तारखे प्रमाणे तर 02 जून रोजी तिथी प्रमाणे जयंती साजरी करण्यात येत असते.यावर्षी जयंती साजरी करण्याबाबत धुळे येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या मध्ये सर्वानुमते एकमुखाने वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी राजपुत समाजाचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक दरबारसिंह गिरासे यांची तसेच स्वागत अध्यक्ष पदी जिल्यातील प्रतिष्ठित गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर युवा नेतृत्व निलेश प्रकाशसिंह जाधव यांची निवड करण्यात आली.

वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांची यांची तारखेनुसार होणारी जयंती 9 मे रोजी जिल्ह्याभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात यावी व तिथीनुसार येणारी जयंती धुळे येथे साजरी करण्यात यावी असे वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी स्मारक समिती अध्यक्ष अजित राजपूत यांच्यातर्फे यावेळी आव्हान करण्यात आले आहे.

जयंतीनिमित्त 09 मे रोजी राष्ट्रगौरव महाराणा प्रतापसिंहजी यांच्या पुतळ्याला सकाळी दुग्ध अभिषेक,पुष्प हार अर्पण करुन अभिवादन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.तिथी प्रमाणे दि 02 जून रोजी मोठ्या जल्लोषात जयंती साजरी करण्यात येईल.या बाबत लवकरच व्यापक स्वरूपात बैठक अध्यक्ष दरबारसिंह गिरासे, स्वागत अध्यक्ष श्निलेश सिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येईल व सर्वांना कळविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे

WhatsApp
Follow by Email
error: