राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धुळे “जिल्हाध्यक्ष” पदाची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर ?

बातमी कट्टा:- धुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पद रिक्त असल्याने जिल्हाध्यक्ष पदी कोणाची वर्णी लागणार ? राष्ट्रवादी पक्ष नेमक कोणाला जिल्हाध्यक्षपदी कार्यरत करतील ?पक्षाचे याबाबतचे राजकीय समिकरण नेमके काय ?कोणावर जिल्हाध्यक्ष पदासाठी सिक्कामोर्तब केला जाईल ?कुठल्या निकषांवर हाय कमांड धुळे जिल्हाध्यक्ष पद जाहीर करतील याकडे जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

जिल्हाध्यक्ष पद म्हटल म्हणजे “संघटक” म्हणून मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर दिली जाते.यामुळे पक्षाच्या राजकीय हालचालींमध्ये त्यांचा मोठा वाटा असतो.यामुळे सगळ्याबाबींचा विचार करुनच जिल्हाध्यक्ष पद घोषीत करण्यात येते.धुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर जिल्हाध्यक्ष पद रिक्त आहे.यासाठी अनेक इच्छुकांनी आपला अहवाल सादर केला असल्याचे सांगितले जात आहेत.मात्र हायकमांड कुठल्या निकषांवर जिल्हाध्यक्ष पदाची नियुक्ती करतील हे अद्याप कोणालाही समजू शकलेले नाही.

जिल्हाध्यक्ष पदासाठी सगळ्यात महत्वाचे म्हणजे संपूर्ण जिल्ह्याभरात कोणाचा जनसंपर्क मोठा आहे. जिल्हाभरातील जनतेशी कोणाची नाड घट आहे.यावर लक्ष दिले जाणार हे नक्की ! विशेष म्हणजे जिल्हाध्यक्ष पद कुठल्या तालुक्यात देण्यात येईल याकडे देखील सर्वांचे लक्ष आहे.कारण प्रत्येक तालुक्यातील एका पेक्षा जास्त मंडळी जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत.

शिंदखेडा तालुक्यातील संदिप बेडसे,सत्यजित सिसोदे,
साक्री तालुक्यातील पोपटराव सोनवणे,सुरेश सोनवणे, जितेंद्र मराठे शिरपूर तालुक्यातील डॉ जितेंद्र ठाकूर,दिनेश मोरे अनेकांनी नावे या जिल्हाध्यक्ष पदाच्या स्पर्धसाठी चर्चेत आहे.मात्र मातब्बर प्रस्तापितांसमोर जिल्ह्याभरात राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा उंचवण्याची ताकद कोणामध्ये हे बघितले जाणार आहे.शिरपूरचे दिनेश मोरे हे काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम सांभाळत आहेत विशेष म्हणजे त्यांच्यावर मोठ्या पदाची देखील जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर इकडे शिंदखेडा तालुक्यातील संदिप बेडसे यांनी भाजप विरोधात तालुक्यात राष्ट्रवादीला मोठे स्थान निर्माण करुन दिले आहे.तर साक्रीतील राष्ट्रवादी नेत्यांचे देखील कार्य अशाच पध्दतीने कार्य सुरु आहे.

तर डॉ जितेंद्र ठाकूर यांनी आपल्या आरोग्य सेवेच्या माध्यमातून जिल्ह्याभरात मोठा जनसंपर्क बांधून ठेवला आहे.त्यांनी राजकारणात केलेली कामे व कुठलाही राजकीय वारसा नसतांना सामान्य व्यक्तीने बलाढ्य व्यक्तींचा दोन वेळा कडवा विरोध केल्याचे संपूर्ण जिल्ह्यातील जनतेने बघितले आहे.राष्ट्रवादी पक्षाचे हायकमांड नेमके कुठल्या आधारावर कोणाला जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळण्यासाठी देतील याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: