बातमी कट्टा:-राष्ट्रीय महामार्गावरील चोपडा फाट्यावर हॉटेल भद्रा जवळ शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरपूर शहराध्यक्ष डॉ.मनोज महाजन यांना 4 जणांकडून कारण नसताना शिवीगाळ करीत हाताबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली असून शहर पोलीस ठाण्यात डॉ.मनोज महाजन यांनी तक्रारी अर्ज दाखल केला आहे याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार डॉ.महाजन हे प्राचार्य डॉ.प्रल्हाद लिंबेकर व मित्र विलास पवार यांच्या सोबत हॉटेल भद्रा वरून जेवण आटोपून घरी जाण्यासाठी निघत असतांना गणेश विजय पाटील रा वरवाडे, पप्पू राजपूत शिरपूर यांच्यासह 2 अनोळखी व्यक्तींनी काही कारण नसतांना शिवीगाळ करून हाता बुक्क्यांनी मारहाण केली. सदर मारहाण आर्थिक व्यवहारातून राजकुमार पावरा व विजय पगारे यांनीच वरील लोकांना मारहाण करण्यास पाठविल्याचा संशय डॉ .महाजन यांनी तक्रारी अर्जात केला आहे.दाखल तक्रारी अर्जावरून शहर पोलीस ठाण्यात गणेश विजय पाटील रा वरवाडे, पप्पू राजपूत शिरपूर यांच्यासह 2 अनोळखी व्यक्तीं विरुद्ध विविध कलमान्वये शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास गुरुदत्त पानपाटील करीत आहेत.