
बातमी कट्टा:- रिकव्हरी मॅनेजर म्हणून कार्यरत असलेल्या 32 वर्षीय तरुणाचा राहत्या घरात गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह आढळल्याची घटना आज दि 13 रोजी सकाळी उघडकीस आली आहे.याबाबत पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपुर शहरालगत असलेल्या मांडळ शिवारातील व्यंकटेश नगर येथे रीतेश मिलिंद साळुंखे वय 32 मुळगाव रा.आदर्श नगर एरंडोल ता एरंडोल जि जळगाव याचा गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला.रीतेश हा खाजगी कपंनीत रिकव्हरी मॅनेजर म्हणून कार्यरत होता अशी माहिती नातेवाईकांनी दिली.आज दि 13 एप्रिल 2022 रोजी सकाळच्या सुमारास व्यंकटेश नगरमधील राहत्या घरी गळफास स्थितीत रीतेशचा मृतदेह मिळून आल्याने मयत रीतेशचा मित्र अमोल प्रभाकर पाटील याने रीतेशला मयत अवस्थेत शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दुपारी 12 वाजता दाखल केले.डाँ गुलाब यांनी रितेश साळुंखे याला तपासुण मयत घोषित केले. याप्रकरणी दुपारी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास के सी सोनवणे करीत आहे.
