
बातमी कट्टा:- महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस नेते राहूल गांधी यांची नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातून भारत जोडो यात्रेतचे महाराष्ट्र राज्यात प्रवेश होत आहे. यासाठी राहुल गांधी यांचे संघर्ष योध्दा म्हणून स्वागत करणारे बॅनर झळकले आहे.भारत जोडो न्याय यात्रा ही महाराष्ट्रात प्रवेश करत असली तरी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी काय बोललात याकडे सर्वांचा लक्ष लागले आहे.

आज नंदुरबार येथे राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेचे आयोज करण्यात आले असून उद्या धुळ्यात भारत जोडो न्याय यात्रा काढण्यात येणार आहे यासाठी धुळे जिल्ह्यामध्ये जयत तयारी झालेली आहे. धुळे जिल्ह्यातील दोडाईचा येथे राहुल गांधी आज मुक्कामाला राहणार आहेत.दोंडाईचा येथे देखील त्यांचा रोड शो होणार आहे.
काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राहुल गांधी यांच्या दौऱ्याबद्दल उत्साह दिसून येत आहे. दोंडाईचा तसंच धुळे शहरामध्ये ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत.धुळे शहरामध्ये उद्या राहुल गांधी महिला मेळाव्याला संबोधित करणार आहेत.
राहुल गांधी यांच्या दौरानिमीत्त पोलीस प्रशासनाकडून सुरक्षाची तयारी केली असून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. धुळे आणि दोंडाईचा दोन्ही ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
