बातमी कट्टा:- शिरपूर शहरात झालेल्या राहुल भोई खूनाच्या घटनेनंतर शिरपूर शहर पोलीसांनी सात संशयितांना ताब्यात घेतले होते .यानंतर याप्रकरणी आता पोलिसांनी आणखी एका संशयिताला अटक केल्याने या खून प्रकरणात अटक झालेल्या संशयितांची संख्या आठ झालेली आहे.
दि ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास राहुल भोई या तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याची घटना शिरपूरात घडली होती.या घटनेनंतर शिरपूर शहर पोलीस स्टेशनात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.याप्रकरणी पोलीसांनी सात संशयितांना अटक केली होती.यातील एकाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली होती.तर इतर संशयितांची धुळे कारागृहात रवानगी करण्यात आली होती.याप्रकरणी शिरपूर शहर पोलीसांनी आता हितेश गुलाब पाटील वय २३ रा शिंगावे शिवार याला राहत्या घराजवळून अटक केली आहे.संशयित हितेश पाटील याला मा.न्यायालयात हजर केले असता दि १६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.या खून प्रकरणी अटक झालेल्या संशयितांची संख्या आता आठ झालेली आहे.