राहुल रंधे यांनी खासदार हिना गावीत यांच्याकडे केला होता पाठपुरावा, अतिदुर्गम भागातील रस्त्यांसाठी 51 कोटींचा निधी मंजूर


बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील पाडे, वाड्यांना मुख्य रस्त्यांशी जोडण्यासाठी आदिवासी उपयोजनेतून तब्बल 51 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या आदेशाने निधीला मंजुरी देण्यात आली. या मागणीसाठी नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ.हीना गावित यांच्याकडे भारतीय जनता पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष तथा पंतप्रधान आत्मनिर्भर संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल रंधे यांनी पाठपुरावा केला होता.


तालुक्याच्या अतिदुर्गम भागात वाडे, वस्ती आणि पाड्यांवर राहणार्‍या आदिवासी बांधवांना रस्त्यांअभावी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. विशेषत: विद्यार्थी, रुग्ण यांचे हाल होतात. त्याबाबत स्थानिकांनी राहुल रंधे यांच्याकडे व्यथा मांडली. राहुल रंधे यांनी खासदार डॉ.हीना गावित यांना माहिती दिली. उभयतांनी अतिदुर्गम भागाचा दौरा करुन परिस्थिती समजावून घेतली. त्यानंतर 26 फेब्रुवारीला डॉ.हीना गावित यांनी आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्याकडे पत्राद्वारे रस्त्यांसाठी निधीची मागणी केली. त्याची दखल घेऊन डॉ.गावित यांनी तातडीने आदिवासी उपयोजनेतून 51 कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे.
आदिवासी उपयोजनेतून मंजूर रस्ते व निधी असा,
1.गुर्‍हाळपाणी-सलईपाडा-बोराडी-निमझरी ते राज्य मार्ग क्र.चार : एक कोटी रुपये. 2. मालकातर-बोरपाणी-फत्तेपूर-मुखेड ते विखरण बु.रस्त्यावर संरक्षक भिंत बांधकामसाठी दीड कोटी रुपये व या रस्त्यावर पुलाचे बांधकाम करण्यासाठी दीड कोटी रुपये. 3. हिवरखेडा ते रामबर्डीदरम्यान जलनि:सारणाच्या कामासह रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी पाच कोटी रुपये. 4. हिगाव ते नाटूपाडा रस्त्यावर पुलाच्या बांधकामासाठी नऊ कोटी रुपये. 5. नांदर्डे-वासर्डी रस्त्यावर पुलाचे बांधकाम व स्लॅब ड्रेन बांधकामासाठी दीड कोटी रुपये. 6.बोराडी ते विद्यानगरदरम्यान जलनि:सारणासह रस्त्याच्या बांधकामासाठी अडीच कोटी रुपये. 7. बोराडी ते चिंचपाणी दरम्यान जलनि:सारणासह रस्त्याच्या बांधकामासाठी दोन कोटी रुपये. 8.नांदर्डे ते सामर्‍यापाणीदरम्यान जलनि:सारणासह रस्त्याच्या बांधकामासाठी अडीच कोटी रुपये. 9. हिवरखेडा ते झारीपाडादरम्यान मोठ्या पुलासह जलनि:सारणासह रस्त्याच्या बांधकामासाठी साडेतीन कोटी रुपये. 10. दुर्बड्या ते गव्हाणीपाडादरम्यान जलनि:सारणासह रस्त्याच्या बांधकामासाठी दोन कोटी रुपये. 11. फत्तेपूर ते रतन लालसिंगपाडादरम्यान जलनि:सारणासह रस्त्याच्या बांधकामासाठी दीड कोटी रुपये. 12. सकर्‍यापाडा ते इंगलपाडादरम्यान जलनि:सारणासह रस्त्याच्या बांधकामासाठी दोन कोटी रुपये. 13. मुखेड ते इतर जिल्हा मार्ग क्र.38 दरम्यान जलनि:सारणासह रस्त्याच्या बांधकामासाठी दोन कोटी रुपये. 14. न्यू बोराडी ते चोंदीपाडादरम्यान जलनि:सारणासह रस्त्याच्या बांधकामासाठी अडीच कोटी रुपये. 15. बोराडी ते खारीखानपाडादरम्यान जलनि:सारणासह रस्त्याच्या बांधकामासाठी दीड कोटी रुपये. 16. बोराडी ते नवापाडा, बुडकीविहिरदरम्यान जलनि:सारणासह रस्त्याच्या बांधकामासाठी अडीच कोटी रुपये. 17.फत्तेपूर ते बोरपाणीदरम्यान जलनि:सारणासह रस्त्याच्या बांधकामासाठी दोन कोटी रुपये. 18.तोंदे येथील गोरक्षनाथ मंदीर ते हिसाळे येथील मलखान नगरदरम्यान जलनि:सारणासह रस्त्याच्या बांधकामासाठी दोन कोटी रुपये. 19. खैरखुटी ते चाचर्‍यापाणीदरम्यान जलनि:सारणासह रस्त्याच्या बांधकामासाठी दीड कोटी रुपये. 20. बभळाज जे हिवरखेडादरम्यान जलनि:सारणासह रस्त्याच्या बांधकामासाठी दीड कोटी रुपये.

शिरपूर तालुक्याच्या दुर्गम भागांना आदिवासी उपयोजनेतील रस्त्यांद्वारे मुख्य मार्गांशी जोडले जाणार असल्यामुळे परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले असून मंत्री डॉ.विजयकुमार गावित, खासदार डॉ.हीना गावित व राहुल रंधे यांचे आभार मानले आहेत.

WhatsApp
Follow by Email
error: