बातमी कट्टा:- सर्वत्र महागाईचा आहाकार होत असतांना पैश्यांचा मोह वाढत असतांना एका रिक्षा चालकाने माणुसकी जीवंत असल्याचे दाखवुन दिले आहे.महिला प्रवासीने लाखो रुपये किंमतीचे दागिने असलेली पर्स रिक्षात विसरुन गेल्याने रिक्षा चालकाने पोलीस स्टेशन गाठत ती पर्स पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.ती पर्स बघून महिलेला आनंदाश्रु अनावर झाले.
लग्न समारंभानिमित्त नाशिक येथून धुळे शहरात आलेल्या होत्या लग्न समारंभानंतर ती महिला नाशिक येथे जाण्यासाठी निघाले होते.यावेळी धुळे शहरातील प्रकाश टॉकीज येथून ही महिला रिक्षात बसुन स्टॅन्ड कडे निघाली मात्र रिक्षातून उतरतांना महिलाकडे असलेली पर्स रिक्षात राहिली.यात सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम आणि इतर साहित्य होते.रिक्षा गेल्यानंतर महिलेच्या लक्षात आले की आपली पर्स रिक्षात राहिली.यानंतर महिलेने शोधाशोध सुरू केली.परंतु रिक्षा चालक संध्याकाळ झाली म्हणून घराकडे निघाले.
यावेळी धुळे येथील गणेश थोरात या रिक्षा चालकाला आपल्या रिक्षात पर्स असल्याचे लक्षात आले.रिक्षा चालक गणेश थोरात यांनी प्रामाणिक पणा दाखवत ती पर्स आझाद नगर पोलीस स्टेशनच्या पोलीसांकडे सुपूर्द केली.यानंतर पोलीसांशी ती पर्स सदर महिलेच्या स्वाधीन केली.लाखो रुपयांचे दागिने असलेली पर्स रिक्षात विसरल्याने दिवसभर शोधाशोध घेऊन देखील पर्स न मिळाल्याने निराश होती.मात्र आझादनगर पोलीसांनी त्या महिलेचा शोध घेऊन ती पर्स त्या महिलेच्या स्वाधीन केले.महिलेला पर्स घेताना आनंदाश्रू अनावर झाले आणि त्यांनी रिक्षाचालकाचे आभार मानले तसेच महिलेच्या नातेवाईकांनी रिक्षाचालकाचा सत्कार केला.