बातमी कट्टा:- रिव्हॉलवर (पिस्तूल)व जिवंत काडतुसे विक्री करण्यासाठी मध्यप्रदेश राज्यातून दोन संशयित चक्क ट्रक घेऊन आल्याची घटना उघड झाली आहे. पोलिसांनी ट्रकसह दोघांना संशयितांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार मध्यप्रदेश राज्यातील देवास जिल्ह्यातील दोन संशयित एम.एच 18 बी.जी 7889 क्रमांकाच्या ट्रकमध्ये धुळे शहराजवळील गुरुद्वारा समोरील पुवाखाली रोडवर आल्यानंतर मोहाडी पोलिसांनी शिताफीने त्यांच्यावर कारवाई केली.
पुलाखाली ट्रक उभी राहुन दोन संशयित खाली उतरले तेव्हा मोहाडी पोलीस स्टेशनचे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व त्यांच्या ट्रकच्या पुढील कँबीनची तपासणी केली असता त्यात एक पिस्तूल (रिव्हॉलवर) व पाच जिवंड काडतुसे मिळन आले.पोलिसांना दोघांचे नाव विचारले असता आरीफ नवाब खान वय 32 व अब्दुल जावेद अब्दुल लतीफ शेख वय 42 दोघे रा.देवास मध्यप्रदेश असे सांगितले. पोलिसांनी पिस्तूल जिवंड काडतूसे व ट्रक जप्त करत दोघांना ताब्यात घेतले आहे.सदर कारवाई मोहाडी पोलीस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई एम.आय.मिर्झा,शाम काळे,अजय दाभाडे,चेतन माळींनी कारवाई केली आहे.