बातमी कट्टा:- राज्यातील आदिवासी शासकीय अनुदानित आश्रमशाळा व विर एकलव्य मॉडेल स्कूल पहिली ते चौथीच्या शाळा दि 15 बुधवार पासून सुरुवात झाले आहेत. शिंदखेडा तालुक्यातील रेवाडी येथील विद्यार्थ्यांचा शिक्षकांकडून फुलगुच्छ व पाठ्यपुस्तक देऊन स्वागत करण्यात आले.
दि 15 डिसेंबर पासून राज्यातील आदिवासी शासकीय अनुदानित आश्रमशाळा व विर एकलव्य मॉडेल स्कूल पहिली ते चौथीच्या शाळा सुरु झाल्या आहेत.शिंदखेडा तालुक्यातील रेवाडी येथील अनु. प्राथमिक आश्रमशाळेत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात हजेरी लागली असून शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व पाठ्यपुस्तक देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांसोबत आलेल्या पालकांचे देखील स्वागत सत्कार करण्यात आले.
यावेळी शाळेचे उपाध्यक्ष रविंद्र रमेश मालचे,माध्यमिक मुख्याध्यापक व्हि.ए.पाटील व प्राथमिक मुख्याध्यापक आर.ए.पवार व सर्व प्राथमिक शिक्षकवृंद उपस्थित होते.