बातमी कट्टा:- सरकारने जाहीर केल्याप्रमाणे महिन्यात दोन वेळा रेशन वाटप न करता महिन्याला एकचदा गावात रेशन वाटप केले जात असून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत आणि राज्य सरकार नियमित रेशन अश्या दोन प्रकारे रेशन मिळत असतांना फक्त एका महिन्यात एकच योजनेचे रेशन दिले जात असून याबाबत चौकशी करावी यासाठी सरपंच, उपसरपंचसह सदस्यांनी व गावकऱ्यांनी आमदार व तहसील कार्यालय येथे तक्रारी अर्ज दिले आहे.
तक्रारी अर्जात म्हटले की,शिरपूर तालुक्यातील चांदपुरी गावात रेशन दुकानदार दुकान क्र 50 असून हे रेशन वाटप करतांना सरकाने जाहीर केल्याप्रमाणे महिन्यात दोनदा रेशन वाटप न करता महिन्याला एकचदा प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत आणि राज्य सरकारचा नियमित रेशन अश्या दोन प्रकारे मिळणारा रेशन न देता महिन्याला फक्त एकच रेशन वाटप केले जात आहे.
महिन्याला प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा रेशन वाटप झाला की,दुसऱ्या महिन्यात राज्य सरकारचा नियमित रेशन वाटप करतांना आढळून आले.म्हणजे महिन्याचा दोघांपैकी एक रेशन वाटप झाला नसल्याचे आढळून आल्याने ग्रामस्थ मंडळी संतप्त झाली आहेत. रेशन विषयी जाब विचारल्यास पुर्णता माहिती देत नसल्याने लोकांची पिळवणूक होत असते,रेशन दुकानदार बाहेर गावाचा असून ,रेशन कार्डाविषयी खुप अडचणी निर्माण होतात.त्यामुळे रेशनदुकान गावातील व्यक्तीकडे असणे आवश्यक आहे. सदर प्रकरणाची योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी असे अर्जात म्हटले आहे.शिरपूर आमदार व तहसील कार्यालय येथे सदर तक्रारी अर्ज देण्यात आला आहे.
अर्जावर चांदपुरी सरपंच आशाबाई मोरे,चंद्रसिंग भिल उपसरपंच,सदस्य सिताबाई भिल,सदस्य उजनाबाई भिल,सदस्य सुनिताबाई पटेल,सदस्य लिलाचंद पाटील यांच्यासह गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.