रोटरी सिनियर्स व सिद्धेश्वर हॉस्पिटल आयोजित मेंदू व मनका तपासणी शिबीरात दोंडाईचा येथे ११० रुग्णांची तपासणी

बातमी कट्टा:- रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सिनियर्स व श्री सिद्धेश्वर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने मेंदू व मनक्यांचे विकार शिबिर दोंडाईचा शहरातील रोटरी आय हॉस्पिटल,रोटरी मार्ग येथे संपन्न झाले.शिबिरात सुप्रसिद्ध न्युरो सर्जन डॉ अभिजित चंदनखेडे व डॉ जितेंद्र ठाकुर यांनी ११० रूग्णांची तपासणी केली यातील ३२ रुग्णांना एम आर आय व पुढील महत्वपूर्ण तपासणी करण्यासाठी धुळे येथे निवड करण्यात आली.


शिबिराचे उद्घाटन डॉ अभिजीत चंदनखेडे , डॉ जितेंद्र ठाकुर, डॉ मुकुंद सोहनी,राजेश मुणोत ,नगरसेवक हितेंद्र महाले , प्रविण महाजन,रोटरी सिनियर्सचे सचिव अँड नितीन अयाचीत इ मान्यवरांनी केले.याप्रसंगी प्रविण महाजन यांनी प्रास्ताविकात सांगितले की रोटरी सिनियर्सच्या माध्यमातून रुग्णांना ज्या दुरापास्त व महाग सुविधा बाहेररगावी जावुन घेणे अवघड असते अशा सर्व सुविधा रुग्णांना दोंडाईचा शहरात अशा शिबिराच्या माध्यमातून देण्यात येतात.

डाँ.जितेद्र ठाकुर यांनी सांगितले की रुग्णांची मेंदू व मनक्याचा सर्व प्रकारच्या तपासणी करुन गरजु रुग्णांची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया , अपघातानंतर तातडीच्या शस्त्रक्रिया ,मेंदुच्या गाठी ( ब्रेन ट्युमर) व कर्करोगाचे निदान त्यावरील शस्त्रक्रिया तसेच लहान मुलांमधील मेंदु विकारांची तपासणी व निदान करण्यात येईल.शिबिरातील गरजु रुग्णांवर श्री सिद्धेश्वर मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटल धुळे येथे एम.आर.आय.व सर्व तपासण्यांवर ५०% सवलत देण्यात येईल तसेच शिबिरातील गरजु रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी श्री सिद्धेश्वर मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटल धुळे येथे सर्व शासकीय योजनेअंतर्गत तसेच विविध कँशलेस सुविधांमधुन उपचार केले जातील.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अँड नितीन अयाचीत यांनी तर आभार प्रदर्शन राजेश मुणोत यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सिनियर्सचे नुतन अध्यक्ष के टी ठाकुर सचिव अँड नितीन अयाचीत प्रो चेअरमन डॉ राजेंद्र पाटील को.प्रो.चेअरमन प्रविण महाजन रोटरी आय हॉस्पिटलचे चेअरमन राजेश मुणोत माजी अध्यक्ष चेतन सिसोदिया दिनेश कर्नावट नामदेव थोरात राजेंद्र परदेसी डॉ राजेंद्र गुजराथी डॉ दिपक सराफ डॉ अनिकेत मंडाले डॉ सचिन पारख संजय छाजेड किशोर मालपुरकर हुसेन भाई विरदेलवाला दिलीप वाघेला सौरभ मुणोत डॉ अनिल धनगर जवाहर केसवानी सिद्धेश्वर हॉस्पिटलचे संचालक डॉ जितेंद्र ठाकुर , जनसंपर्क अधिकारी राकेश पाटील , शिवनेरी प्राथमिक व मंजुळाबाई महाले आश्रमशाळा तसेच रोटरी आय हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी वृंद इ पदाधिकाऱ्यांनी केले .

WhatsApp
Follow by Email
error: