
बातमी कट्टा:- लग्नाच्या एक महिन्यानंतर विवाहित महिलेने गळफास घेऊन आपली जिवनयात्रा संपवल्याची घटना काल दि 16 रोजी सायंकाळी घडली आहे.राहत्या घरात विवाहितेचा ओढणीने गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह मिळुन आला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील
जोयदा (दोंदवाडे पाडा ) येथील तोताराम मोतीराम पावरा यांचे न्यु बोराडी येथील मनीषा पावरा वय 24 यांच्या सोबत मागच्या महिन्यात दि 8 मे रोजी विवाह झाला होता.मनीषा पावरा यांनी नर्सींगचे शिक्षण पुर्ण केले होते.तर तोताराम पावरा हा शिरपूर येथील खाजगी रुग्णालयात कामाला होता.काल दि 16 रोजी मनिषा पावरा हिचा जोयदा (दोंदवाडे पाडा) येथे राहत्या घरी ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला.
मनीषा पावरा यांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे.विवाहाच्या एक महिनानंतर मनिषा पावरा हिने गळफास घेतल्याने सर्वत्र हळहळव्यक्त होत आहे. आत्महत्याचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
