बातमी कट्टा,योगेश्वर मोरे:- लग्न सोहळ्यासाठी शिरपूरकडे जाणाऱ्या चारचाकी कारचा आणि एसटी बसची जोरदार धडक झाल्याने अपघात घडला.याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आज दि 20 जून रोजी सकाळी 12.20 वाजताच्या सुमारास शिरपूर परिवहणाची बस क्रं एम एच 20 बिएल 3513 शिरपूर हुन जळगाव च्या दिशेने जात असतांना जळगाव हुन शिरपूर च्या दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिझाइर कार क्रं एम एच 19 बिजे 2455 ने जोरदार धडक दिली.

कार चालक हे लग्न सोहळ्यासाठी शिरपूरच्या दिशेने येत होते, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यात सुदैवाने कुणासही दुखापत झालेली नसून, बस व कार चे नुकसान झाले आहे.वाहन चालक रवींद्र पंडितराव सूर्यवंशी यांनी कार चालक विरोधात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास थाळनेर पोलीस करत आहेत.