बातमी कट्टा:- लाच स्विकारतांना संशय आल्याने लाच न स्विकारता निघून गेलेल्या तलाठीला सहा हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याप्रकरणी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतल्याची घटना आज दि 31 रोजी दुपारच्या सुमारास घडली असून त्या तलाठी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार खंबाळे तक्रारदार हे खंबाळे येथील असून यांचे वडिलांच्या नावावर खंबाळे येथे शेत जमीन आहे. तक्रारदार यांचे वडील सन २०१७ साली मयत झाले असून त्यांचे नावावर असलेल्या शेत जमिनीस काही कारणास्तव वारस लावण्याचे राहुन गेले होते.सदर शेत जमिनीस वारसदार लावण्यासाठी दि १८ जानेवारी २०२३ रोजी शिरपूर तालुक्यातील खंबाळे येथील तलाठी सुऱ्या पायल्या कोकणी,वय-53 यांनी स्वतः करिता तक्रारदार यांच्याकडून पंच साक्षीदार यांच्या समक्ष प्रथम ७ हजार रूपयांची ची मागणी केली व नंतर तडजोडी अंती ६ हजार रुपये लाचेची मागणी केली मात्र लाच स्विकारतांना संशय आल्याने लाच न स्विकारता तलाठी कोकणी हे मुंबई आग्रा महामार्गावर शिरपूरच्या दिशेने निघून गेले.म्हणून तलाठी कोकणी यांना धुळे लाचलुचपत विभागाने ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई सापळा पर्यवेक्षण अधिकारी अनिल बडगुजर पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे,सापळा अधिकारी मंजितसिंग चव्हाण पोलीस निरीक्षक ला.प्र.वि.धुळे,सहा. सापळा अधिकारी प्रकाश झोडगे पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.धुळे,सापळा पथक मधील राजन कदम,शरद काटके,संतोष पावरा,भूषण शेटे,भूषण खलाणेकर, रामदास बारेला,रोहिणी पवार,प्रशांत बागुल,संदिप कदम,गायत्री पाटील,प्रवीण पाटील, मकरंद पाटील,सुधीर मोरे,जगदीश बडगुजर आदींनी कारवाई केली आहे.