लाच स्विकारतांना कनिष्ठ लिपिकसह खाजगी पंटर ताब्यात

बातमी कट्टा:- जिल्हा कारागृह नंदुरबार येथे अटकेत असलेल्या नातेवाईकांचा जामीन करण्यासाठी आवश्यक असलेल्या साॅलव्हन्सी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी 1 हजारांची लाच स्वीकारतांना खाजगी पंटरसह तहसिल कार्यालयातील कनिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार तक्रारदाराचा नातेवाईक जिल्हा कारागृह नंदुरबार येथे अटकेत आहे. त्यांच्या जामीन करण्यासाठी त्यांना साॅलव्हन्सी प्रमाणपत्राची आवश्यकता होती. तक्रारदार यांनी साॅलव्हन्सी प्रमाणपत्र मिळण्यासाठी शहादा तहसील कार्यालय येथे अर्ज सादर केला असता,आलोसे कनिष्ठ लिपीक पंकज दिगंबर आयलापूरकर यांनी साॅलव्हन्सी प्रमाणपत्र देण्याच्या कामात मदत करण्याच्या मोबदल्यात एक हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला असता संबंधित अधिकाऱ्यांनी सापळा रचत 13 मे रोजी कृष्णा सुदाम जगदेव रा.भादे, ता. शहादा या खाजगी पंटराला एक हजार रुपयांची लाच साक्षीदारांसमोर स्वीकांरताना नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.कनिष्ठ लिपीक पंकज दिगंबर आयलापूरकर व खाजगी पंटर कृष्णा सुदाम जगदेव या दोघांना तहसील कार्यालय शहादा येथून ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र सुनील कडासने,अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., नाशिक परीक्षेत्र, नाशिक नारायण न्याहाळदे, पोलीस उपअधीक्षक (वाचक) ला.प्र.वि., नाशिक परिक्षेत्र सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नंदुरबार राकेश आ. चौधरी, पोलीस निरीक्षक, माधवी स. वाघ, पोलीस निरीक्षक, समाधान म. वाघ,पोह विलास पाटील, पोना अमोल मराठे, मपोना ज्योती पाटील, पोहवा विजय ठाकरे, पोना संदीप नावाडेकर, पोना देवराम गावित व चापोना जितेंद्र महाले यांच्या पथकाने कार्यवाही केली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: