बातमी कट्टा:- प्रधानमंत्री पीकविमा योजनेची रक्कम मिळवून देण्यासाठी 2 हजार 540 रूपयांची लाच स्विकारतांना पोलीस पाटीलला धुळे लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतल्याची घटना दुपारी आज दि 20 रोजी घडली आहे.
तक्रारदार यांच्या वडीलांचे नावे 1 हेक्टर 27 आर जमीन असून या जमिनीवर पिकावर प्रधानमंत्री फसल विमा योजनेची रक्कम मिळवून देण्यासाठी 20 रूपये गुंठ्याप्रमाणे शिंदखेडा तालुक्यातील दलवाडे प्र.न गावाचे पोलीस पाटील अनंत भाईदास देशमुख वय 40 यांनी 2 हजार 540 रुपयांची लाच मागितली होती. याबाबत लाचलुचपत विभागाने सापळा रचला असता यावेळी पोलीस पाटील अनंत देशमुख याला पैसे स्विकारतांना धुळे पथकाने ताब्यात घेतले आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, सहा.अधिकारी मणजितसिंग चव्हाण,जयंत साळवे,शरद काटके,कैलास जोहरे,पुरूषोत्तम सोनवणे,कृष्णकांत वाडीले, राजन कदम,प्रशांत चौधरी, भूषण खलाणेकर,भूषण शेटे,संतोष पावरा,संदीप कदम,महेश मोरे,चालक सुधीर मोरे,बडगुजर आदींनी कारावाई केली आहे.