बातमी कट्टा:- लालचंदनाची कंत्राटी शेतीच्या नावाने शिरपूर तालुक्यातील 27 शेतकऱ्यांना 27 शेतकऱ्यांना 22 लाख 20 हजाराचे चंदन लावून संशयित फरार झाल्या बाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लालचंदन लागवाडी बाबत अनेक आश्वासने येथील शेतकऱ्यांना देण्यात आली होती.
शिरपूर तालुक्यातील झेंडेअंजन,जोयदा,कनगई,अंजनपाडा लाकड्या हनुमान या गावांतील 27 शेतकऱ्यांची 22 लाख 20 हजारात फसवणूक झाली आहे. येथील शेतकऱ्यांना तामिळनाडू येथील श्री लक्ष्मी गणपती नर्सरीच्या नावाने फेब्रुवारी महिन्यात 7 ते 8 जणांनी येथील शेतकऱ्यांची भेट घेतली व त्यांना शेतात लालचंदन लागवड करण्यासाठी सांगितले. आमच्या नर्सरीतून रोपे घेतल्यास लालचंदनाची आम्ही लागवड करुन देऊ,शेताला तारेचे कंपाऊंड, सौर उर्जेवर चालणारे पंप बसवू ,झाडांची निगा राखून त्याला लागणारा सर्व खर्च आम्ही करु,सुरक्षारक्षक नेमू,आठ वर्षांनी झाड तोडणी लायक झाल्यानंतर साडेनऊ हजार रुपये घनफूट प्रमाणे विकत घेऊ, लालचंदन लागवड करुन घेणाऱ्या प्रत्येकी शेतकऱ्याला 20 लाख देऊ व अंतिम वर्षात लालचंदन झाडांचा व्यवहार करतांना ती रक्कम वजा करुन घेतली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले होते.
त्यांच्यावर विश्वास ठेवत झेंडेअंजन, जोयदा, कनगई, अंजनपाडा, लाकड्याहनुमान या गावातील 27 शेतकऱ्यांनी प्रत्येकी दोनशे रुपये दराने रोपे खरेदी करण्याचा व्यवहार करत शेतकऱ्यांनी 22 लाख 20 हजार रूपये तामिळनाडू येथील त्या संशयितांना दिले.मात्र त्याबदल्यात शेतकऱ्यांना पुर्ण रोपे दिले नाहीत.सदर रोपांची किंमत फक्त 30 रुपये असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. शेतकऱ्यांन संबधीत व्यक्तींना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते फरार झाल्याचे समजले. तामिळनाडू राज्यातील कृष्णागिरी येथील श्री लक्ष्मी गणपती नर्सरीचा एक संचालक एम रवीकुमार चित्राकुल्याप्पा मारीमिनु,के.श्रीनिवासलू व नायडू यांच्यासह सात ते आठ जणांनी फेब्रुवारी महिन्यात येथील शेतकऱ्यांची भेट घेतली होती.याबाबत सतीलाल पावरा यांनी सांगवी पोलीस स्टेशनात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.